

Daily Horoscope 20 October 2026: आज 20 ऑक्टोबर, मंगळवारचा दिवस विजयादशमी म्हणजेच दसऱ्याचा अत्यंत शुभ सण घेऊन आला आहे. आजच्या दिवशी ग्रहांच्या विशेष स्थितीमुळे आणि लक्ष्मीनारायण व बुधादित्य योगामुळे अनेक राशींचे नशीब उजळणार आहे. ग्रहांच्या गतीनुसार आजचा दिवस काही राशींसाठी सुवर्णयोग घेऊन आला असून, अनेकांना अप्रत्याशित यश आणि धनलाभ होण्याची शक्यता आहे. चला तर मग जाणून घेऊया आजचे राशीभविष्य..
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आर्थिक अडचणी दूर करणारा ठरेल. बऱ्याच दिवसांपासून सुरु असलेले वाद मिटतील आणि कामात नशिबाची साथ मिळेल. वृषभ राशीच्या जातकांसाठी नोकरी-व्यवसाय दोन्ही ठिकाणी वातावरणात सकारात्मकता राहील. तुमच्या मेहनतीचे कौतुक होईल आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. मिथुन राशीच्या लोकांसाठी प्रगतीचे नवे मार्ग उघडतील. तथापि, घाईगडबडीत काम करताना सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.
कर्क राशीच्या व्यक्तींनी आज नियोजनावर भर दिल्यास ठरवलेले प्रोजेक्ट वेळेत पूर्ण होतील. घरात किंवा कामाच्या ठिकाणी स्पष्ट संवाद ठेवल्यास गैरसमज टळतील. सिंह राशीच्या लोकांना कामाचा थोडा ताण जाणवू शकतो. नकारात्मक विचार मनातून काढून मेहनतीवर लक्ष केंद्रित केले तरच योग्य फळ मिळेल. कन्या राशीसाठी आजचा दिवस उत्साहाचा राहील. व्यवसायात नवीन संधी किंवा मोठा व्यवहार होण्याची शक्यता आहे.
तूळ राशीच्या लोकांना आज विरोधकांवर मात करण्यासाठी हुशारी आणि धैर्याचा वापर करावा लागेल. निष्काळजीपणा टाळल्यास यश तुमचेच असेल. वृश्चिक राशीच्या जातकांना दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर अचानक धनलाभ किंवा चांगला राजकीय-सामाजिक फायदा होऊ शकतो. जुने मित्र भेटल्याने मन प्रसन्न राहील. धनु राशीच्या लोकांसाठी करिअरच्या दृष्टीने नवी दारे उघडतील आणि गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची चिन्हे आहेत.
मकर राशीच्या लोकांसाठी नवीन काम सुरु करण्यासाठी आजचा दिवस अत्यंत उत्तम आहे. जुन्या प्रयत्नांना मोठे यश मिळेल. कुंभ राशीच्या जातकांची एखादी प्रलंबित इच्छा पूर्ण होऊ शकते. आर्थिक बाबतीत लाभाचे योग आहेत. मीन राशीच्या लोकांना आज धार्मिक किंवा आध्यात्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. कामातील सातत्यामुळे वरिष्ठांची शाबासकी मिळेल.
एकंदरीत, दसऱ्याचा हा पावन दिवस सर्वांसाठीच नवीन उमेद आणि सकारात्मक ऊर्जा घेऊन आला आहे. हनुमानाची उपासना करुन आणि संयम ठेवून पुढे गेल्यास सर्वांनाच शुभ फळे मिळतील.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.