Shani Gochar 2026: 9 ऑक्टोबरपासून सुरु होणार 5 राशींचा सुवर्णकाळ! करिअर, व्यवसायात धनलाभाची संधी; मिळणार बक्कळ पैसा

Shani Nakshatra Gochar 2026: द्रिक पंचांगानुसार, शुक्रवारी (9 ऑक्टोबर) सायंकाळी 7 वाजून 28 मिनिटांनी शनिदेव रेवती नक्षत्रातून निघून उत्तर भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करणार आहेत.
Shani Nakshatra Gochar 2026
Shani Gochar 2026Dainik Goamntak
Published on: 
Updated on: 

Shani Nakshatra Gochar 2026: द्रिक पंचांगानुसार, शुक्रवारी (9 ऑक्टोबर) सायंकाळी 7 वाजून 28 मिनिटांनी शनिदेव रेवती नक्षत्रातून निघून उत्तर भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करणार आहेत. शनिदेवाचे हे नक्षत्र परिवर्तन आगामी 8 फेब्रुवारी 2027 पर्यंत राहणार असून, या काळामध्ये अनेक राशींच्या नक्षत्रांचे योग अत्यंत अनुकूल ठरणार आहेत. शनिचे स्वतःच्याच नक्षत्रातील हे भ्रमण वृषभ, मिथुन, कन्या, तुळ आणि मकर या पाच राशींच्या जातकांसाठी अत्यंत फायदेशीर आणि प्रगतीचे ठरणार आहे.

वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ नात्यांमधील दुरावा संपवून संबंध सुधारणारा ठरेल. आर्थिक बाजू भक्कम होण्यासोबतच करिअरमध्ये अपेक्षित यश लाभेल. वैवाहिक जीवन आनंदी राहून व्यवसाय आणि नोकरीत प्रगतीच्या अनेक नवीन संधी उपलब्ध होतील. मिथुन राशीच्या जातकांना करिअरच्या क्षेत्रात मोठी मजल मारता येईल. मनातील ताणतणाव पूर्णपणे नाहीसा होऊन आर्थिक फायदा होईल. केलेल्या मेहनतीचे चीज होईल आणि कार्यालयात तुमच्या कामाचे भरभरुन कौतुक केले जाईल.

Shani Nakshatra Gochar 2026
Horoscope 5 October 2026: सोमवारी 'या' राशींवर बरसणार महादेवाची कृपा; धनलाभ आणि प्रगतीचे उत्तम योग!

कन्या राशीच्या मंडळींचे अनेक दिवसांपासून रखडलेले किंवा अडकून पडलेले महत्त्वाचे कागदोपत्री कामे किंवा प्रकल्प मार्गी लागतील. मार्गात येणारे सर्व अडथळे दूर होऊन मानसिक शांती लाभेल आणि नशिबाची पूर्ण साथ मिळेल. या काळात अचानक धनलाभ होण्याचे प्रबल योग आहेत. तुळ राशीच्या व्यापाऱ्यांसाठी हा काळ सुवर्णकाळासारखा असेल, जिथे व्यवसायात उत्तम यश आणि मेहनतीचे योग्य फळ मिळेल. करिअरमध्ये उच्च पदावर पोहोचण्याची संधी मिळून जुनी अडकलेली येणी किंवा पैसा परत हातात येईल.

Shani Nakshatra Gochar 2026
Horoscope: 4 ऑक्टोबरचा दिवस ठरणार खास! 'या' राशींचं नशीब उजळणार; नोकरी-व्यवसायात मोठा फायदा, प्रेमजीवनही होईल सुखकर

मकर राशीच्या जातकांसाठी शनिचे हे स्वनक्षत्रातील गोचर अत्यंत भाग्यवान सिद्ध होणार आहे. नोकरी करणाऱ्या लोकांना वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सहकार्याने मोठे यश मिळण्यासोबतच बढतीचे (Promotion) मार्ग मोकळे होऊ शकतात. एकूणच, या सर्वच राशींच्या लोकांसाठी हा काळ आर्थिक स्थैर्य आणि आनंदाची नवी दारे उघडणारा ठरेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com