World Turtle Day 2023 : आगोंद किनारा गजबजलेलाच, तरीही कासवांचे आगमन

25 वर्षांचा कालावधी : 5,000 पिल्लांना सोडले समुद्रात; पर्यावरणप्रेमी सुखावले
World Turtle Day 2023
World Turtle Day 2023Gomantak Digital Team
Published on
Updated on

सुभाष महाले

गजबजलेल्या आगोंद समुद्रकिनाऱ्यावर गेल्या 25 वर्षांच्या कालावधीत सर्वाधिक 68 सागरी कासवांचे आगमन होऊन त्यांनी सात हजार अंडी घातली. त्यापैकी 60 घरट्यांतून पाच हजार पिल्ले समुद्रात सोडण्यात आली. गालजीबाग किनाऱ्यावर 30 सागरी कासवांचे आगमन झाले असून 24 कासवांच्या घरट्यांतून पिल्ले समुद्रात सोडण्यात आली आहेत. काणकोण तालुक्यातील आगोंद, गालजीबाग कासव संवर्धन केंद्रात यंदा सागरी कासवांचे आगमन शंभरीपर्यंत पोहोचले आहे. सध्या आजपर्यंत आगोंद किनाऱ्यावर 68 कासवांचे आगमन होऊन त्यांनी सुमारे 7 हजार अंडी घातली आहेत.

एका आठवड्यामागे दोन सागरी कासवांनी आगोंद किनाऱ्याजवळ उभारलेल्या वन खात्याच्या टेहळणी घराजवळच येऊन अंडी घातली. त्या अंड्यांचे स्थलांतर अन्य ठिकाणी न करता त्याच ठिकाणी त्यांचे संवर्धन करण्यात आले आहे. तर सागरी कासवांसाठी आरक्षित असलेल्या गालजीबाग किनाऱ्यावर 30 सागरी कासवांचे आगमन होऊन त्यांनी अंडी घातली आहेत. काणकोण तालुक्यात गालजीबागचा संपूर्ण किनारा व आगोंद किनाऱ्याचा काही भाग सागरी कासवांच्या संवर्धन व जतनासाठी आरक्षित करण्यात आला आहे.

World Turtle Day 2023
Idol Found In River : सांकवाळ येथे सापडली विजयादुर्गेची मूर्ती

आगोंद किनाऱ्यावर 11 मार्चपर्यंत 45 ऑलिव्ह रिडले कासवांचे आगमन होऊन त्यांनी अंडी घातली होती. मात्र, त्यानंतर 5 सागरी कासवांचे आगमन होऊन ती संख्या 50 वर पोहोचली होती. 15 ते 21 मे या आठवड्यात सोमवारपासून पाच सागरी कासवांचे आगमन समुद्रकिनाऱ्यावर आगमन होऊन त्यांनी 495 अंडी घातली होती. पर्यटन व्यवसायाने गजबलेल्या आगोंद किनाऱ्यावर 36 सागरी कासवांनी अडी घातली होती. मात्र, त्यानंतर ती संख्या दिवसेंदिवस वाढत गेली, अशी माहिती सागरी कासव प्रकल्पाच्या दक्षिण गोवा झोनचा ताबा असलेल्या उपक्षेत्रीय वनाधिकाऱ्यांनी दिली.

World Turtle Day 2023
Vikram - Anurag Kashyap : "मला ई-मेल मिळालाच नाही" चियान विक्रमचं अनुराग कश्यपला उत्तर..काय आहे प्रकरण?

गालजीबाग किनाऱ्यावर वन खात्याने सुमारे 3 हजार चौ. मी. जमीन सागरी कासव संवर्धन केंद्रासाठी आरक्षित केली आहे. दरवर्षी या किनाऱ्यांवर हंगामी टेहळणी कुटिरे उभारतात. सागरी कासवांच्या संवर्धन व संरक्षणासाठी वन खात्यातर्फे आठ रक्षकांची नेमणूक दोन्ही किनाऱ्यांवर करण्यात येते.

World Turtle Day 2023
G-20 Kashmir: G-20 बैठकीदरम्यान बिलावल भुट्टो झरदारीची PoK वारी, पुन्हा ओकणार गरळ?

गालजीबाग किनारा आरक्षित म्हणून जाहीर

  • गालजीबाग किनाऱ्यावरून या मोसमातील पहिल्या सागरी कासवाच्या घरट्यातून 67 पिल्ले समुद्रात सोडण्यात आली होती. या घरट्याचे स्थलांतर जवळच्या तळपण किनाऱ्यावरून करण्यात आले होते.

  • डिसेंबर महिन्यात एका सागरी कासवाचे आगमन तळपण किनाऱ्यावर होऊन त्याने 93 अंडी घातली होती. गालजीबाग किनारा हा सागरी कासवांसाठी आरक्षित आहे. त्याचप्रमाणे दक्षिण गोवा मरिन झोनचे ते मुख्यालय आहे.

World Turtle Day 2023
dry fish in goan market दिवस सुक्या मासळीचे.. खारवलेले, सुकवलेले मासे आता बाजारात
  • त्यासाठी आगोंद सोडून दक्षिण गोव्यात कोणत्याही समुद्रकिनाऱ्यावर सागरी कासवांचे आगमन होऊन त्यांनी अंडी घातल्यास त्यांच्या संरक्षणासाठी ती गालजीबाग किनाऱ्यावर स्थलांतरित करण्यात येतात.

  • एका घरट्यातून पिल्ले बाहेर येण्यास सुमारे 45 ते 50 दिवसांचा कालावधी लागतो. ज्या किनाऱ्या़वर सागरी कासवांच्या पिल्लांचा जन्म होतो. ती कासवे वयात आल्यानंतर त्याच किनाऱ्यावर अंडी घालण्यासाठी परत येत असतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com