G-20 Kashmir: G-20 बैठकीदरम्यान बिलावल भुट्टो झरदारीची PoK वारी, पुन्हा ओकणार गरळ?

G-20 Kashmir: तिसरी G-20 टुरिझम वर्किंग ग्रुपची बैठक काश्मीरमध्ये होत आहे. यामुळे पाकिस्तान चांगलाच भडकला आहे.
Bilawal Bhutto Zardari
Bilawal Bhutto ZardariDainik Gomantak

G-20 Kashmir: तिसरी G-20 टुरिझम वर्किंग ग्रुपची बैठक काश्मीरमध्ये होत आहे. यामुळे पाकिस्तान चांगलाच भडकला आहे. विशेष म्हणजे, पाकिस्तान या बैठकीचा भाग नाही. तर दुसरीकडे, पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी श्रीनगरपासून 100 किमी दूर असलेल्या पीओकेमध्ये पोहोचले आहेत. ते रविवारी येथे पोहोचले.

23 मे पर्यंत ते येथेच राहणार आहेत. यादरम्यान ते येथे भारताविरुद्ध गरळ ओकण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे. खरे तर, 2019 मध्ये, काश्मीरमधून कलम 370 हटवल्यापासून, पाकिस्तान चांगलाच चिडला आहे.

दरम्यान, बिलावल भुट्टो झरदारी यांना या भेटीतून काश्मीरमध्ये होणारी जी-20 बैठक अयशस्वी ठरवायची आहे. यामध्ये त्यांना कुराफतखोर चीनचा पाठिंबा मिळाला आहे. चीनने काश्मीरमध्ये होणाऱ्या जी-20 बैठकीपासून दूर राहून वादग्रस्त प्रदेशात होणाऱ्या जी-20 बैठकीला विरोध केला आहे.

पाकिस्तानच्या (Pakistan) परराष्ट्रमंत्र्यांनी पीओकेमध्ये पाऊल ठेवल्यानंतर संयुक्त राष्ट्राच्या ठरावांचे उल्लंघन करुन भारताला जगात महत्त्वाची भूमिका बजावणे शक्य नाही, असे विधान केले.

Bilawal Bhutto Zardari
Jammu And Kashmir: श्रीनगरमध्ये हाय अलर्ट! G-20 बैठकीपूर्वी ISI चे K-2 डेस्क सक्रिय; आत्मघातकी हल्ल्याचा धोका

दुसरीकडे, बिलावल भुट्टो यांना जगाला हा संदेश द्यायचा आहे की, काश्मीरमध्ये जी-20 बैठक आयोजित करुन भारताला (India) तेथील लोकांचा आवाज दाबायचा आहे. या दौऱ्यामागील त्यांचा हेतू 23 मे रोजी बाग काश्मीरमध्ये एका सभेला संबोधित करणार असल्याचे कळत आहे. ते भारताविरुद्ध विष ओकण्याची शक्यता आहे.

मंगळवारी ते काश्मीर निर्वासितांचीही भेट घेणार आहेत. बाग काश्मीरमध्ये 8 जून रोजी पोटनिवडणूक होणार आहे. त्यांनी मुद्दाम तिथे रॅली काढण्याचे ठरवले आहे, जेणेकरुन भारताविरुद्ध गरळ ओकून आपल्या पक्षाचा फायदा होईल.

बिलावल पीओकेमध्ये विधानसभेला संबोधित करणार आहेत

पाकिस्तानी वृत्तपत्र द डॉनच्या वृत्तानुसार, बिलावल भुट्टो सोमवारी पीओकेमध्ये विधानसभेला संबोधित करणार आहेत. डॉनने राजनैतिक सूत्रांच्या हवाल्याने माहिती दिली आहे की, असे करणारे ते पहिले फेडरल मंत्री असतील.

पूर्वी पाकिस्तानमध्ये हा विशेषाधिकार फक्त पाकिस्तानातील राष्ट्रप्रमुख आणि सरकार यांच्यापुरताच मर्यादित होता. दरम्यान, जी-20 बैठकीचा निषेध करण्यासाठी सोमवारी मुझफ्फराबादमधील बुरहान वानी चौकात निषेध रॅली काढण्यात येणार आहे.

पीओकेच्या अनेक भागात अशी रॅली होण्याची शक्यता आहे. पीओकेच्या माध्यमातून पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांना काश्मीरबाबत भारताविरुद्ध अपप्रचार करायचा आहे.

Bilawal Bhutto Zardari
G20 पर्यटन वर्किंग ग्रुपची आजपासून बैठक, श्रीनगरमध्ये तीन दिवसीय बैठकीच आयोजन

पाकिस्तानला भयंकर संकटांनी वेढले आहे

पाकिस्तानबद्दल बोलायचे झाल्यास, एकीकडे देश गंभीर आर्थिक संकटातून जात आहे. तर दुसरीकडे, गृहयुद्धासारखी परिस्थिती आहे. इम्रान खान यांच्या अटकेनंतर अनेक भागात हिंसाचार उसळला. लष्कराच्या कार्यालयांनाही लक्ष्य करण्यात आले. अजूनही परिस्थीती सामान्य नाही.

काश्मीरचा मुद्दा उपस्थित करुन ते आपले अपयश लपवण्यासाठी पाकिस्तानातील लोकांसमोर भारताला लक्ष्य करत आहे.

गोव्यात नुकत्याच झालेल्या एससीओच्या बैठकीत बिलावल भुट्टो यांनी काश्मीरचा मुद्दा उचलून धरला होता. जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेणे हे भारत आणि पाकिस्तानमधील संबंध बिघडण्याचे कारण असल्याचे त्यांनी म्हटले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com