Goa Bison Attack: गव्याच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी, पाठीत शिंग खुपसले; स्थानिकांत भीतीचे वातावरण

Goa Forest Department: बार्देश तालुक्यातील मानशेर-रेवोडा येथे गव्याने केलेल्या हल्ल्यात ४५ वर्षीय महिला गंभीर जखमी झाली.
Goa Bison Attack
Goa Forest DepartmentDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा: बार्देश तालुक्यातील मानशेर-रेवोडा येथे गव्याने केलेल्या हल्ल्यात ४५ वर्षीय महिला गंभीर जखमी झाली. निसर्गाचा समतोल बिघडल्यामुळे वन्यजीव आता थेट मानवी वस्त्यांमध्ये घुसून हल्ले करू लागल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सिंथिया फर्नांडिस असे जखमी महिलेचे नाव असून, तिच्यावर सध्या गोमेकॉत उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना रविवारी (ता. ३१ मे) सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास घडली. सिंथिया फर्नांडिस या पाळीव कुत्र्याला घेऊन घरापासून अवघ्या ५० मीटर अंतरावर शेतात गेल्या होत्या.

Goa Bison Attack
Goa Bison Car Accident: गोव्यात धावत्या कारला गवा रेड्याची जोरदार धडक, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली; चालक थोडक्यात बचावला!

त्याचवेळी एका महाकाय गव्याने पाठीमागून त्यांच्यावर अचानक जोरदार हल्ला केला. गव्याने त्यांच्या पाठीत शिंग खुपसल्याने त्या रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर कोसळल्या. त्यांच्या पायालाही गंभीर दुखापत झाली आहे. कुटुंबीयांनी त्यांना तातडीने म्हापसा जिल्हा रुग्णालयात नेले. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना गोमेकॉत हलविण्यात आले.

वन्यजीवांच्या वाढत्या हल्ल्यांवर तीव्र चिंता आणि संताप व्यक्त करत सिंथिया यांचा मुलगा हेडन याने प्रशासनाला आणि वनविभागाला जाब विचारला आहे. जंगले नष्ट होत असल्याने वन्य प्राणी लोकवस्तीत येत आहेत. आज माझ्या आईवर घराच्या दारात हल्ला झाला, उद्या हीच जनावरे घरात घुसतील. सरकारने आणि वनविभागाने वन्य प्राण्यांचा लोकवस्तीतील वावर रोखण्यासाठी तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी आग्रही मागणी हेडन याने केली.

Goa Bison Attack
Bison Attack : दिनेश गावडेवर गव्याकडूनच हल्ला! वन खात्याचा दावा फेटाळला: घटनास्थळाची अधिकाऱ्यांकडून पाहणी

या घटनेमुळे रेवोडा परिसरात सध्या कमालीची दहशत पसरली आहे. राज्यातील मानव-वन्यजीव संघर्ष आता खरोखरच विकोपाला गेला असून, यावर वनविभागाने तात्काळ, कायमस्वरूपी व ठोस तोडगा काढावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

श्‍वानाचे प्रसंगावधान कौतुकास्पद

या अनपेक्षित हल्ल्यानंतर सिंथिया यांच्या पाळीव श्‍वानाने कमालीचे प्रसंगावधान दाखविले. मालकिणीला वाचविण्यासाठी त्याने गव्याच्या समोर उभे राहून जोरजोरात भुंकण्यास सुरुवात केली. कुत्र्याचा आवाज ऐकून घरातील व परिसरातील लोक तातडीने घटनास्थळी धावून आले. नागरिकांनी एकजुटीने आणि धैर्याने गव्याला हाकलून लावले. त्यामुळे सिंथिया यांचे प्राण वाचले. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com