Goa Bison Car Accident: गोव्यात धावत्या कारला गवा रेड्याची जोरदार धडक, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली; चालक थोडक्यात बचावला!

Gaur Attack Betoda Bori Bypass: बेतोडा-बोरी बायपास रस्त्यावर एका अनपेक्षित आणि भीषण अपघातात मोठी दुर्घटना टळली. वास्को येथील रहिवासी जावेद शेख हे आपल्या कारने उसगाव ते वास्को प्रवास करत होते.
Gaur Attack Betoda Bori Bypass
Goa Bison Car AccidentDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: बेतोडा-बोरी बायपास रस्त्यावर एका अनपेक्षित आणि भीषण अपघातात मोठी दुर्घटना टळली. वास्को येथील रहिवासी जावेद शेख हे आपल्या कारने उसगाव ते वास्को असा प्रवास करत होते. यादरम्यान, अचानक एक भलामोठा गवा रेडा रस्त्यावर आला आणि त्याने थेट धावत्या कारला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, यामध्ये कारच्या पुढील भागाचा पूर्णपणे चुराडा झाला. सुदैवाने, या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि कार चालक जावेद शेख हे सुखरुप बचावले.

हा अपघात इतका अचानक आणि वेगवान घडला की चालक जावेद शेख यांना कारवर नियंत्रण मिळवण्यासाठी किंवा बाजूला घेण्यासाठी सेकंदाचाही वेळ मिळाला नाही. गव्याने कारला समोरुन थेट धडक दिल्यामुळे वाहनाचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले. अपघाताचा मोठा आवाज होताच परिसरातील स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि कारमध्ये अडकलेल्या चालकाला सुखरुप बाहेर काढत मदतकार्य केले.

Gaur Attack Betoda Bori Bypass
Goa Accident Death: कंटेनरच्या चाकाखाली संसाराचा चुराडा, बोरी येथील अपघातात महिलेचा मृत्यू; पती किरकोळ जखमी

या घटनेमुळे बेतोडा-बोरी बायपास रस्त्यावरील सुरक्षेचा आणि रात्रीच्या काळोखाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, या संपूर्ण परिसरात रात्रीच्या वेळी रस्त्यावर प्रचंड काळोख असतो. स्ट्रीट लाईट्सची पुरेशी व्यवस्था नसल्यामुळे वाहनचालकांना समोरील रस्ता स्पष्ट दिसत नाही. त्यातच हा परिसर वनक्षेत्राला लागून असल्याने रात्रीच्या आणि पहाटेच्या वेळी गवे किंवा इतर वन्यजीव अचानक मुख्य रस्त्यावर येतात. यामुळे येथे नेहमीच अपघाताचा (Accident) मोठा धोका निर्माण होतो.

Gaur Attack Betoda Bori Bypass
Goa Accident: गोव्यात आला अन नियतीनं घात केला! उत्तर प्रदेशच्या 30 वर्षीय तरुणाचा अपघाती मृत्यू; ट्रकनं दिली जोरदार धडक

या अपघाताच्या पार्श्वभूमीवर, वनक्षेत्रातून जाणाऱ्या किंवा वन्यजीवांचा वावर असलेल्या रस्त्यांवरुन प्रवास करताना वाहनचालकांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी आणि पहाटेच्या सुमारास वाहनाचा वेग मर्यादित ठेवावा आणि अत्यंत सावधगिरीने वाहन चालवावे, जेणेकरुन अशा अनपेक्षित संकटांवेळी संभाव्य अनर्थ टाळता येऊ शकेल. तसेच प्रशासनाने या धोकादायक रस्त्यांवर तातडीने प्रकाश व्यवस्था करावी, अशी मागणीही आता जोर धरत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com