Sanjay Singh: मुख्यमंत्री सावंत यांच्या पत्नीने संजय सिंहविरोधात मानहानीचा खटला का दाखल केला? आप नेत्याचं 'तर्कशास्त्र' वाचा

Sulakshana Sawant Vs Sanjay Singh: केसमुळे संजय सिंह यांना दिल्लीत लक्ष घालता येणार नाही, त्यामुळे हा खटला दाखल करण्यात आल्याचा आरोप नाईक यांनी केला.
Sanjay Singh: हा तर कट! संजय सिंग यांच्यावर Goa CM यांच्या पत्नीने मानहानीचा खटला दाखल का केला? आप नेत्यांनी सांगितले कारण
AAP MP Sanjay Singh And Sulakshana SawantDainik Gomantak
Published on
Updated on

Sulakshana Sawant Vs Sanjay Singh

पणजी: कॅश फॉर जॉब प्रकरणात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या पत्नीवर आरोप केल्याप्रकरणी आप नेते, राज्यसभा खासदार संजय सिंह अडचणीत सापडले आहेत. मुख्यमंत्री सावंत यांच्या पत्नी सुलक्षणा सावंत यांच्या सिंह यांच्याविरोधात १०० कोटी रुपये मानहानीचा खटला दाखल केला आहे. यावरुन आता राजकारण तापले असून, मानहानीचा खटला दाखल करणे एका कटाचा भाग असल्याचा आपने आरोप केला आहे.

गोवा आपचे महासचिव वाल्मिक नाईक यांच्यासह इतर नेत्यांनी पत्रकार परिषद घेत भाजप आणि मुख्यमंत्री सावंत यांच्यावर टीका केली. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या पत्नीने संजय सिंह यांच्याविरोधात दाखल केलेला मानहानीचा खटला म्हणजे त्यांना दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारापासून दूर ठेवण्याचा कट आहे, असे नाईक म्हणाले. दिल्ली विधानसभेची निवडणूक येत्या फेब्रुवारीत जाहीर होण्याची शक्यता आहे.

Sanjay Singh: हा तर कट! संजय सिंग यांच्यावर Goa CM यांच्या पत्नीने मानहानीचा खटला दाखल का केला? आप नेत्यांनी सांगितले कारण
Amit Naik: सुलेमान खानला मदत करणाऱ्या अमित नाईकला कोर्टाचा दणका; न्यायालयीन कोठडीत रवानगी

संजय सिंह यांना न्यायालयीन सुनावणीसाठी गोव्यात यावे लागेल, या केसमुळे वेळ वाया जाईल आणि ते निवडणूक प्रचारावर लक्ष केंद्रित करू शकणार नाहीत. संजय सिंह आपचे प्रमुख प्रचारक आहेत. पण, केसमुळे त्यांना दिल्लीत लक्ष घालता येणार नाही, त्यामुळे हा खटला दाखल करण्यात आल्याचा आरोप नाईक यांनी केला. तसेच, कोठडीतून फरार सिद्दीकी उर्फ सुलेमान खान या प्रकरणावरुन लक्ष विचलित करण्यासाठी देखील हा खटाटोप केला असावा, असे नाईक म्हणाले.

Sanjay Singh: हा तर कट! संजय सिंग यांच्यावर Goa CM यांच्या पत्नीने मानहानीचा खटला दाखल का केला? आप नेत्यांनी सांगितले कारण
Goa Assembly Winter Session 2025: नोकरी घोटाळा, सुलेमान खान प्रकरण गाजणार; 06 फेब्रुवारीपासून गोवा विधानसभेचे हिवाळी अधिवेशन

गोवा मुख्यमंत्र्यांच्या पत्नी सुलक्षणा सावंत यांनी मंगळवारी (१७ डिसेंबर) उत्तर गोव्यातील डिचोली गावातील न्यायालयात संजय सिंह यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल केला. सिंह यांनी नोकरी घोटाळ्यात आपले नाव घेतल्याचा आरोप त्यांनी केलाय. या अंतर्गत त्यांनी आप नेत्याकडे 100 कोटी रुपयांची भरपाई मागितलीय. न्यायालयाने याप्रकरणी सिंह यांना नोटीस बजावली असून, 10 जानेवारी 2025 पर्यंत उत्तर मागितले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com