Goa Assembly Winter Session 2025: नोकरी घोटाळा, सुलेमान खान प्रकरण गाजणार; 06 फेब्रुवारीपासून गोवा विधानसभेचे हिवाळी अधिवेशन
Goa Assembly Winter Session 2025
पणजी: गोवा विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाची तारीख जाहीर झाली असून, नव्या वर्षात ०६ फेब्रुवारीपासून अधिवेशन सुरु होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी याबाबत माहिती दिली आहे. अधिवेशनाच्या काळात राज्यात गाजत असलेला नोकरी घोटाळा, सुलेमान खान फरार प्रकरण जोरदार गाजण्याची शक्यता आहे.
पर्वरीतील मंत्रालयात पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी माध्यमांना संबोधित केले. ०६ फेब्रुवारी २०२५ रोजी राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांच्या अभिभाषणाने हिवाळी अधिवेशनाची सुरुवात होईल. त्यापूर्वी ०९ आणि १० जानेवारी २०२५ रोजी वित्त आयोगाची बैठक पार पडेल, अशी माहिती मुख्यमंत्री सावंत यांनी दिली.
अधिवेशनात कोणते मुद्दे गाजणार?
हिवाळी अधिवेशनात राज्यात खळबळ माजवणारा नोकरी घोटाळा गाजण्याची शक्यता आहे. या घोटाळ्यात समोर आलेली मंत्री, नेते आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या नावावरुन विरोधक सरकारवर जोरदार हल्ला करतील. याशिवाय अलिकडेच उघडकीस आलेले सिद्दीकी उर्फ सुलेमान खान फरार प्रकरणावरुन विरोधक सरकारला धारेवर धरतील. तसेच, जमीन हडप प्रकरण, खाण वाहतूक प्रश्न, म्हादई यासह विविध मुद्दे विधानसभेत गाजणार आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.