Goa Literacy: पुढल्या वर्षी 100 टक्के साक्षर होणार गोवा; CM डॉ. प्रमोद सावंत यांचा विश्वास

Goa Literacy Rate: सर्व समुदाय आणि पंचायतींनी यासाठी सहकार्य करावे, कोणीही अशिक्षित राहणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
Goa Literacy: पुढल्या वर्षी 100 टक्के साक्षर होणार गोवा; CM डॉ. प्रमोद सावंत यांचा विश्वास
Goa CM Dr. Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Literacy Rate

पणजी: गोवा पुढील वर्षी १९ डिसेंबर २०२५ पर्यंत शंभर टक्के साक्षर होईल, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला. शनिवारी (०७ डिसेंबर) स्वंंयपूर्ण गोवा वेबिनार सत्रात मुख्यमंत्री सावंत बोलत होते. स्थानिकांना आणि पंचायतींना सोबत घेऊन १०० टक्के साक्षरतेच्या दिशेने वाटचाल करणार असल्याचे सावंत म्हणाले.

गोवा सरकार केंद्र सरकारच्या मदतीने किसान क्रेडिट कार्ड, किसान सॉईल कार्ड आणि किसान विमा कार्ड उपलब्ध करुन शेतकऱ्यांना देखील यात समाविष्ट करुन घेणार असल्याचे मुख्यमंत्री सावंत म्हणाले. १९ डिसेंबर २०२५ पर्यंत गोवा शंभर टक्के साक्षर होईल, असे सावंत म्हणाले. सर्व समुदाय आणि पंचायतींनी यासाठी सहकार्य करावे, कोणीही अशिक्षित राहणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

Goa Literacy: पुढल्या वर्षी 100 टक्के साक्षर होणार गोवा; CM डॉ. प्रमोद सावंत यांचा विश्वास
गुगल मॅपनं विश्वासघात केला, यायचं होतं गोव्यात पोहोचले कर्नाटकात; घनदाट जंगलात रात्रभर अडकून पडली बिहारची फॅमिली

केरळ राज्य शंभर टक्के साक्षर असल्याचा दावा करते पण प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी आहे. मात्र, गोव्यासाठी हे ध्येय खऱ्याअर्थाने पूर्ण करने सोप्प आहे, असे सावंत म्हणाले. शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या किसान क्रेडिट कार्ड, किसान सॉईल कार्ड आणि किसान विमा कार्ड यासारख्या योजना आणि सुविधांचा शंभर टक्के लाभ मिळायला हवा, असेही सावंत यावेळी म्हणाले.

Goa Literacy: पुढल्या वर्षी 100 टक्के साक्षर होणार गोवा; CM डॉ. प्रमोद सावंत यांचा विश्वास
Cashew in Goa: काजूच्या पिकाला अवकाळी पावसाचा फटका; मोहोर धरण्यासाठी कडाक्याची थंडी आवश्यक

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यावेळी राज्य सरकारतर्फे नियुक्त करण्यात आलेल्या स्वंयपूर्ण मित्रांचे कौतुक केले. स्वंयपूर्ण मित्रांमुळे केंद्र सरकारच्या योजना नागरिकांपर्यंत १०० टक्के पोहोचवण्यासाठी प्रयत्न करतायेत, असेही सावंत म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com