सोशल मीडियावर प्रसिध्दी सोडून कुडतरीच्या आमदाराने 25 वर्षांत काय काम केले? भाजप नेत्याचा सवाल

पत्रकार परिषदेत बार्बाेझा यांनी भाजपच्या कामांची माहिती दिली
Curtorim BJP
Curtorim BJPDainik Gomantak
Published on
Updated on

BJP Curtorim : मुख्यमंत्री प्रमोद सावंत सरकारला पाठिंबा दिलेले कुडतरी मतदारसंघाचे आमदार आलेक्‍स रेजिनाल्‍ड लॉरेन्‍स (MLA Aleixo Reginaldo Lourenco) आणि स्‍थानिक भाजप मंडळ यांच्‍यात असलेला स्‍तुप्‍त वाद आज पुन्‍हा एकदा उफाळून आला.

आमदार आलेक्‍स रेजिनाल्‍ड यांनी सोशल मीडियावर प्रसिध्दी सोडून कुडतरी मतदारसंघात कोणती विकासकामे केली आहेत असा सवाल भाजप नेते अँथनी बार्बाेझा यांनी केला आहे.

Curtorim BJP
नावेली पंचायतीच्या सरपंचपदी लुसिया कार्व्हालो तर उपसरपंचपदी दामू चव्हाण यांची बिनविरोध निवड

"आमदार लॉरेन्‍स यांनी मागील 25 वर्षात मतदारसंघासाठी काहीच केलेले नाही. छोटी छोटी कामे करुन सोशल मीडियावर प्रसिध्दी कशी मिळवता येईल एवढेच त्‍यांनी पाहिले" असा आरोप भाजप नेते अँथनी बार्बाेझा यांनी केला.

कुडतरी येथे पत्रकार परिषद घेत अँथनी बार्बाेझा यांनी भाजपच्या कामांची माहिती दिली. यावेळी डॉ. स्नेहा भागवत, अँथनी बार्बाेझा, बबिता बोरकर, जयेश नाईक व भाजप कुडतरी मंडळाचे सदस्य उपस्थित होते.

Curtorim BJP
म्हादई नदीच्या पात्रात बुडालेल्या युवकाचा अखेर मृतदेह सापडला

बार्बोझा म्हणाले, "मागील 20 वर्षांत कुडतरीच्‍या रस्‍त्‍यांकडे आमदाराचे दुर्लक्ष झाले. त्‍यामुळे मंडळाला मंत्र्यांकडे जाऊन या रस्‍त्‍यांची दुरुस्‍ती करुन घ्‍यावी लागली. स्‍थानिक भाजप मंडळातर्फे लोकांची कामे होऊ लागल्‍याने लोकांचा भाजपावरील विश्वास वाढला असून लोक आता भाजपबरोबर येत आहेत."

"काही दिवसांपूर्वी झालेल्या कार्यकर्ता मेळाव्‍यात 300 पेक्षा अधिक कार्यकर्ते उपस्‍थित होते. कुडतरी मतदारसंघातील भाजपची लोकप्रियता पाहता येत्‍या निवडणुकीत निश्चित कमळ फुलेल" असा विश्वास बार्बोझा यांनी यावेळी व्यक्त केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com