सत्तरीतील वेळगे नदीच्या पात्रात बेती पर्वरीतील 18 वर्षीय युवक रविवार संध्याकाळी सहलीसाठी आला असता पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाला होता. वाळपई अग्निशमक दलाच्या जवानांनी युवकाचा शोध घेतला. मात्र, काल रात्र झाल्याने शोध मोहिम थांबवावी लागली होती.
अखेर आज दुपारी मृतदेहाचा शोध घेण्यात अग्निशमक दलाच्या जवानांना यश आले. मृतदेहाचा पंचनामा करुन उत्तरीय तपासणी गोमोकाॅत पाठविण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, रविवारी सुट्टीच्या दिवशी बेती पर्वरी येथील 18 वर्षीय युवक शिवकुमार पवार व त्याच्या मित्रांचा ग्रुप वेळगे सत्तरी येथील राजग्योची कोंड या म्हादई नदी परिसरात आले होते.
पोहण्यासाठी नदीत उतरले होते. त्यापैकी शिवकुमार हा नदीच्या प्रवाहात वाहून गेला तर आणखीन एकाला बुडताना वाचविण्यात साथीदारांना यश मिळाले. घटनेची माहिती मिळताच वाळपई अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पाचारण करण्यात आले.
शिवकुमार याचा शोध घेण्यात आला. मात्र, रात्र झाल्याने शोध मोहीम थांबविण्यात आली. सोमवारी सकाळ पासुन वाळपई अग्नीशमन दलाच्या जवानांनी युध्द पातळीवर शोध मोहिम राबवली होती. त्यानंतर दुपारी 1 च्या नंतर मृतदेह शोधण्यात यंत्रणेला यश आले. यावेळी पंचनामा करुन मृत्यदेह गोमोकाॅत पाठविण्यात आला आहे.
वाळपई पोलिस निरिक्षक दिनेश गडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु आहे. तसेच अग्नीशमन दलाच्या अधिकारी संतोष गावस यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी मदत कार्य केले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.