"मतदारा वालोर तुजो दवर रे"...

मतदान जागृती कार्यक्रमाला लाभला  प्रचंड प्रतिसाद
Voting Awareness Program: मतदार वालोर तुजो दवर रे गीतांचा कार्यक्रम सादर केल्यावर मडगावचे संयुक्त मामलेदार प्रवीण गांवस यांच्याहस्ते सन्मानचिन्ह स्विकारताना प्रदीप पंडित व इतर कलाकार.

Voting Awareness Program: मतदार वालोर तुजो दवर रे गीतांचा कार्यक्रम सादर केल्यावर मडगावचे संयुक्त मामलेदार प्रवीण गांवस यांच्याहस्ते सन्मानचिन्ह स्विकारताना प्रदीप पंडित व इतर कलाकार.

Dainik Gomantak

Published on
Updated on

सासष्टी: सद्या गोव्यात आगामी 2022च्या विधानसभा निवडणुकीची जागृती (Goa Assembly Election2022) आणि महत्व सांगणाऱ्या गीतांचा कार्यक्रम  मतदारा वालोर तुजो दवर रे---- मडगाव आणि फातोर्डा बुथ लेव्हल ऑफिसर (बीएलओ) यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच सादर करुन राज्यात निवडणुक (Goa Election) वातावरण निर्मिती केली आहे. 

पुर्वी सकाळी सकाळी घरोनघरी वासुदेन येण्याची परंपरा होती. वासुदेव आपल्याला शुभ संकेत देऊन जात.. पण हा प्रकार लुप्त झाला. त्याचे महत्व या जागृती (Voting Awareness Program) गीतात सुरेख रित्या मांडण्यात आलेले आहे. 

<div class="paragraphs"><p>Voting Awareness Program: मतदार वालोर तुजो दवर रे गीतांचा कार्यक्रम सादर केल्यावर मडगावचे संयुक्त मामलेदार प्रवीण गांवस यांच्याहस्ते सन्मानचिन्ह स्विकारताना प्रदीप पंडित व इतर कलाकार.</p></div>
साखळीत अत्याधुनिक कदंब बसस्थानकाचे उदघाटन

साई नाईक हे यात सर्वांचेच लक्ष वेधुन घेतात व या गीताकडे युवक वर्ग जास्त आकर्षित होत आहे. आपल्या नृत्य व अभिनयातुन कपिल नाडकर्णी यानी युवा वर्गात उत्साह भरला आहे. भक्ती परंपरेतील गारुड हा गीत प्रकार संत ज्ञानेश्र्वर माउली यापासुन संत तुकाराम, संत एकनाथ

अशा अनेक संतांनी गारुडातुन समाज प्रबोधन केले. या गीत प्रकाराचा उपयोग या जागृती गीतात अतिशय प्रभावीपणे सांगितले आहे. यामध्ये महेंद्र वायंगणकर आपल्या अभिनयातुन संतपरंपरेतील अतिशय जुन्या आठवणी जागृत करतात. गोव्यातील कोकणी काताराचाही उपयोग करण्यात आला असुन ज्युलियस जोन्स यानी स्वता गायिलेल्या गीतातून मतदानाचे महत्व प्रस्तुत केले आहे.

<div class="paragraphs"><p>Voting Awareness Program: मतदार वालोर तुजो दवर रे गीतांचा कार्यक्रम सादर केल्यावर मडगावचे संयुक्त मामलेदार प्रवीण गांवस यांच्याहस्ते सन्मानचिन्ह स्विकारताना प्रदीप पंडित व इतर कलाकार.</p></div>
Christmas: फादर स्टीफन्स

या मतदार जागृती करणाऱ्या गीताची संकल्पना, दिग्दर्शन, गीत लेखन, गायन मडगावचे मामलेदार कचेरीतील संयुक्त मामलेदार प्रवीण गावस यांचे आहे. प्रवीण गावस यांच्या बुथ लेव्हल ऑफिसरचे महत्व सांगणाऱ्या गीताचे प्रकाश यावेळी केंद्रीय मुख्य निवडणुक आयुक्त सुशील चंद्रा, निवडणुक आयुक्त राजीव कुमार, अनुप पांडे तसेच गोव्यातील मुख्य अधिकाऱ्यांच्या उपस्थिती प्रकाशन करण्यात आले.

मतदार जागृती गीतांमध्ये मडगाव व फातोर्डा बुथ लेव्हल मतदार जागृती गीतांमध्ये मडगाव व फातोर्डा बुथ लेव्हल ऑफिसर यांचा सक्रिय सहभागआहे. त्यामध्ये साई नाईक, महेंद्र वायंगणकर, कपिल नाडकर्णी, ज्यलियस जोन्स, सुषमा शिरवईकर

वालावलीकर, उल्हास कारापुरकर, प्रतिमा फळदेसाई, परेश विर्डिकर, सदानंद नाईक, स्नेहा देसाई, जयश्री पुजारी, कृष्णा नायडू, केशव देसाई, नीता नाईक, सरोज दुर्भाटकर, शिवराम जामुनी, प्रदिप विर्डिकर व प्रदीप पंडित यांचा सहभाग आहे. शिवाय समरी रिवीजन गीत निर्मितीमध्ये अनेक बुथ लेव्हल ऑफिसर यांचा सहभाग आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com