Goa Congress: जमीन हडप, नोकरी घोटाळा, सुलेमान खान फरार प्रकरण; सीएमच्या घरावर मोर्चा काढणारे काँग्रेस पदाधिकारी पोलिसांच्या ताब्यात

Goa Congress Protest: खबरदारी म्हणून मोर्चा येण्यापूर्वीच पोलिसांचा मोठा बंदोबस्त मुख्यमंत्री सावंत यांच्या निवास्थानाबाहेर तैनात करण्यात आला आहे.
Goa Congress: जमीन हडप, नोकरी घोटाळा, सुलेमान खान फरार प्रकरण; सीएमच्या घरावर मोर्चा काढणारे काँग्रेस पदाधिकारी पोलिसांच्या ताब्यात
Goa Congress ProtestDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Congress Protest

पणजी: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या सरकारी निवसास्थानी जाणाऱ्या आंदोलनकर्त्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जमीन हडप प्रकरण, नोकरी घोटाळा, सिद्दीकी उर्फ सुलेमान खान फरार तसेच, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी आंबेडकरांबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून काँग्रेसने आंदोलन व मोर्चा काढला आहे.

काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी मुख्यमंत्री सावंत यांच्या निवासस्थानाबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेण्यापूर्वी पोलिसांनी पदाधिकाऱ्यांना आझाद मैदान येथे रोखले. प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर आणि विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे, उपाध्यक्ष सुनील कवठणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मोर्चा मुख्यमंत्री सावंत यांच्या निवास्थानी जात असताना त्याला रोखण्यात आले.

Goa Congress: जमीन हडप, नोकरी घोटाळा, सुलेमान खान फरार प्रकरण; सीएमच्या घरावर मोर्चा काढणारे काँग्रेस पदाधिकारी पोलिसांच्या ताब्यात
Goa Vs Bali: एक लाखाचं बजेट! गोवा, बाली का थायलंड? पर्यटक कुठे जायला देतायेत पसंती?

राज्यात कॅश फॉर जॉब स्कॅम, जमीन हडप प्रकरण, सिद्दीकी उर्फ सुलेमान खान फरार प्रकरणावरुन काँग्रेस आक्रमक झाली आहे. तसेच, आंबेडकरांचे नाव घेण्याची फॅशन झालीय, एवढ्यावेळा देवाचं नाव घेतलं असतं तर स्वर्ग मिळाला असता, असे वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी राज्यसभेत केले होते. या वक्तव्यामुळे देशभरातून शहांवर टीका होत आहे.

आंबेडकरवादी शहांच्या राजीनाम्याची मागणी करतायेत. गोव्यात देखील याचे पडसाद पाहायला मिळत असून, काँग्रेसने याप्रकरणी मुख्यमंत्री सावंत यांच्या सरकारी निवास्थानावर मोर्चा काढला आहे. खबरदारी म्हणून मोर्चा येण्यापूर्वीच पोलिसांचा मोठा बंदोबस्त मुख्यमंत्री सावंत यांच्या निवास्थानाबाहेर तैनात करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com