'मी भाजपात जाणार ही केवळ अफवा, गोवा फॉरवर्डचा त्याग आठवा'

मागच्यावेळी सरकार घडत नव्हते त्यामुळे एका रात्रीत मला निर्णय घ्यावा लागला; विजय सरदेसाई
Vijay Sardesai says It is just a rumor that I will join BJP Remember the abandonment of Goa Forward
Vijay Sardesai says It is just a rumor that I will join BJP Remember the abandonment of Goa Forward Dainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव : मी भाजपात जातो ही काही पक्षातील नेत्यांनी आणि प्रसार माध्यमांनी पसरवलेली अफवा आहे. मला भाजपातील कुणीही भेटलेला नाही किंवा मीही कुणाला भेटलेलो नाही, असा खुलासा गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष व फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी केला आहे.

मागचे काही दिवस सरदेसाई हे भाजपात (BJP) सामील होत असून, भाजप सरकारात त्यांना मंत्रिपद (Minister) दिले जाणार अशी चर्चा सुरू होती. मात्र, यावर सरदेसाई यांनी कुठलाही खुलासा केला नव्हता. आज त्यांनी याबाबतचे मौन सोडले.

Vijay Sardesai says It is just a rumor that I will join BJP Remember the abandonment of Goa Forward
मंत्रिमंडळात बदलाची शक्यता; मुख्यमंत्री परतले राणे दिल्लीतच

सरदेसाई म्हणाले, मी कोणताही निर्णय घेण्यापूर्वी माझ्या मतदारांना विश्वासात घेणार आहे. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे जे लोकांना पाहिजे तोच निर्णय घेणार. मागच्यावेळी सरकार घडत नव्हते त्यामुळे एका रात्रीत मला निर्णय घ्यावा लागला. यावेळी तशी स्थिती निश्चितच नाही असे ते म्हणाले.

ते म्हणाले, खरे तर ही वेळ सरकारात (Government) सामील व्हायचे की नाही यावर विचार करण्याची नव्हे. तर भाजपविरोधी जनमत असतानाही भाजप सरकार सत्तेवर आले आणि हे सरकार सत्तेवर येऊ नये यासाठी विरोधी पक्षांनी जो त्याग करायला पाहिजे तो केला गेला का? यावर विचार करायचा आहे.

Vijay Sardesai says It is just a rumor that I will join BJP Remember the abandonment of Goa Forward
अन्यथा 'या' प्रकरणाला वेगळे वळण लागणार काँग्रेस आमदारांचा इशारा

गोवा फॉरवर्डचा त्याग आठवा

गोवा फॉरवर्डने (Goa Forward) सात जागा मागितल्या होत्या. पण, तीन जागांवर समाधान मानून आम्ही त्याग केला. मात्र, इतरांनी तो तसा केला का? यावर विचार करण्याची गरज आहे. गोवा फॉरवर्डने केलेला त्याग आठवण्याऐवजी काहीजण फक्त अफवा पसरवण्याचे काम करत आहेत, अशी खंत विजय सरदेसाई (Vijay Sardesai) यांनी व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com