मंत्रिमंडळात बदलाची शक्यता; मुख्यमंत्री परतले राणे दिल्लीतच

मंत्रिमंडळात बदलाची शक्यता; भाजप निरीक्षक उद्या गोव्यात
The possibility of a cabinet reshuffle in goa
The possibility of a cabinet reshuffle in goaDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : विधानसभा निवडणुकीत भाजपाला बहुमत मिळूनसुद्धा लांबलेल्या शपथविधी सोहळ्यामागे पक्षात सारे काही ठिक आहे, अशी स्थिती नाही. काल रात्री उशिरा काळजीवाहू मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांना गृहमंत्री अमित शहा, पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी दिल्लीला बोलवून घेतले होते. या बैठकीतील तपशील मिळाले नसले तरी पक्षात धुसफूस सुरूच आहे, असे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

मुख्यमंत्री सावंत बैठक संपवून रात्रीच गोव्यात पोहचले. मात्र, राणे यांनी अजून दिल्लीत तळ ठोकला आहे. ते पक्षाच्या विविध पदाधिकाऱ्यांशी चर्चा करीत असल्याची खात्रिलायक माहिती आहे. राणे यांची मुख्यमंत्रिपदावरील दावेदारी कायम असून, त्यांनी ती पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना बोलून दाखवली आहे. त्यामुळे नव्या रचनेनुसार, मंत्रिमंडळात मोठ्या बदलाची शक्यता व्यक्त होत आहे.

The possibility of a cabinet reshuffle in goa
गाडी चालवताना 'या' गोष्टी ठेवा लक्षात, नका करू चुका

भाजपच्या (BJP) केंद्रीय संसदीय समितीने नियुक्त केलेले कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर आणि केंद्रीय मंत्री एल. मुरुगन उद्या (सोमवारी) गोव्यात (goa) दाखल होत आहेत. संध्याकाळी ते भाजपाच्या सुकाणू समितीशी चर्चा करून विधीमंडळ सदस्यांशी चर्चा करणार आहेत. या चर्चेनंतर ते पक्षाचा विधीमंडळ गटनेता निवडतील, अशी माहिती काळजीवाहू मुख्यमंत्री सावंत यांनी दिली आहे.

दिल्लीत झालेल्या बैठकीत नेता निवडीबरोबर मंत्रिपदाविषयक चर्चा झाली असून, ‘मगो’प आणि गोवा फॉरवर्ड (Goa Forward) यांना मंत्रिमंडळात घेण्याविषयी पक्षाचे वरिष्ठ अनुकूल असले तरी या दोन्हीही पक्षांना मंत्रिमंडळात घेण्याविषयीचा स्थानिक नेत्यांचा विरोध कायम आहे.

The possibility of a cabinet reshuffle in goa
गोव्यातील पराभवावर मंथन करणं आवश्यक; विजय सरदेसाई

शपथविधीची तयारी सुरू

बहुमत मिळूनसुद्धा अनेक दिवस लांबलेल्या सरकारस्थापनेचा (Government) तिढा सुटत नाही हे शनिवारी रात्री तातडीच्या मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली भेटीवरून स्पष्ट होत आहे. यावेळी राणे यांनाही पक्षश्रेष्ठींनी बोलवून घेऊन काही सूचना केल्याची माहिती आहे. मात्र, सरकार स्थापनेचा तिढा अजूनही सुटलेला नाही. दुसरीकडे पक्षाने डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर शपथविधीची जय्यत तयारी सुरू केली आहे.

सुकाणू समितीत अस्वस्थता

मुख्यमंत्री (CM) दिल्ली भेट उरकून पहाटे उशीराच राज्यात पोहचले. त्यांनी आज पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर बैठक केली. या बैठकीत पक्षाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, संघटन सचिव सतीश धोंड, दत्ता खोलकर, संजीव देसाई उपस्थित होते. या बैठकीत मंत्रिमंडळ, शपथविधी सोहळा, यावर चर्चा झाली असली तरी विश्वजीत राणे (Vishwajeet Rane) यांनी ठोकलेला दिल्लीतील तळ अनेक गोष्टींना अनिश्चिततेच्या गर्तेत सोडत असल्याने भाजपच्या सुकाणू समितीतही अस्वस्थता वाढली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com