अन्यथा 'या' प्रकरणाला वेगळे वळण लागणार काँग्रेस आमदारांचा इशारा

9 जणांना अटक, 38 जणांच्या मागावर पोलीस
Congress MLAs warn that Margao issue will take a different turn
Congress MLAs warn that Margao issue will take a different turnDainik Gomantak
Published on
Updated on

वास्को : काँग्रेसच्या सात आमदारांनी बोगदा येथील मुरगाव पोलीस स्थानकात येऊन होळीच्या दिवशी दोन गटात झालेल्या दंगलीचे कारण विचारून विनाकारण, काँग्रेसच्या कार्यकर्त्या वर आरोप दाखल करून त्यांना अटक का करण्यात आली. याचे पोलीस उपअधीक्षक शेख सलिम तसेच मुरगावचे पोलीस निरीक्षक अजीत उम्रे यांना कारण विचारले. तसेच विनाकारण अटक केलेल्यांना तसेच आरोप दाखल केलेल्यांची ताबडतोब सुटका करा. अन्यथा या प्रकरणाला वेगळेच वळण लागणार असल्याचा इशारा काँग्रेस आमदारांनी यावेळी दिला.

शुक्रवारी होळी (Holi) धुलिवंदनाच्या दिवशी मुरगाव मतदार संघात राजकीय पक्षांच्या समर्थकांमध्ये हाणामारी झाल्याने वातावरण बरेच तंग बनले आहे. मुरगावचे नगरसेवक प्रजय मयेकर यांचे वडील प्रदीप मयेकर हे घरी परतत असताना त्यांच्यावर सुमारे चाळीस ते पन्नास जणांनी हल्ला केल्याने त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी मुरगाव पोलिसांकडून 9 जणांना अटक करण्यात आली असून अन्य 38 जणांच्या पोलीस मागावर आहे.

Congress MLAs warn that Margao issue will take a different turn
मंत्रिमंडळात बदलाची शक्यता; मुख्यमंत्री परतले राणे दिल्लीतच

दरम्यान, याला राजकीय स्वरूप आले असून त्याच रात्री भाजपचे (BJP) संघटन मंत्री सतीश धोंड ॲड नरेंद्र सावईकर, वास्कोचे आमदार दाजी साळकर, यांनी मुरगाव पोलीस स्थानकात धाव घेऊन दंगलखोरांना अटक करण्याची मागणी केली होती. त्यानुसार त्यारात्री पासून ते काल शनिवार पर्यंत एकूण 9 जणांना अटक करण्यात आली होती. तसेच काल शनिवार राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तसेच पोलीस संचालक आय डी शुक्ला यांनी उपजिल्हा हॉस्पिटलमध्ये जखमी मयेकर यांची भेट घेतली. त्यानंतर दोषींवर कठोर कारवाई केली जाईल आणि कोणालाही सोडले जाणार नाही असा इशारा दिला होता. तसेच काँग्रेसने तृणमूल काँग्रेस पक्षाची हाणामारीची संस्कृती स्वीकारण्याची टीका सावंत यांनी करून ही काँग्रेस आणि टीएमसीची संस्कृती असल्याचा टोला मारला होता.

दरम्यान, काळजीवाहू मुख्यमंत्री सावंत यांनी मुरगाव मध्ये येऊन राजकीय नाट्य रचले असल्याचे काँग्रेसच्या नेत्यांनी म्हटले आहे. विधानसभा निवडणुकीत पराभूत पराभूत झालेले भाजपचे उमेदवार पराभव स्विकारण्याची ताकद संपल्याने हातास झाले असून त्यांनी पाठिंबा देणार्‍या जनतेला त्रास देणे शिवीगाळ करणे सुरू केले आहे. दरम्यान या घटनेला अनुसरून आज काँग्रेसचे मडगावचे (Margao) आमदार दिगंबर कामत, कळंगुटचे आमदार मायकल लोबो, कुंकळीचे आमदार युरी आलेमाव, केपेचे आमदार कार्लुस फरेरा तसेच मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर आदींनी मुरगाव पोलीस स्थानक गाठून काँग्रेस कार्यकर्त्यांना अटक करण्याचे कारण विचारले. यावेळी पोलिस उपाधीक्षक शेख सलीम व निरीक्षक अजित उम्रे यांच्यावर सर्व आमदारांनी प्रश्नांचा भडीमार केला. त्यांना विनाकारण राजकारण करून अटक करण्याचे सत्र थांबवा अशी मागणी केली. यावर उपअधीक्षक शेख सलीम यांनी आपण कायद्यानुसार सर्व प्रतिक्रिया करत असून या दंगलीत सामील नसलेल्यांना विनाकारण त्रास देणार नसल्याचे ते म्हणाले.

Congress MLAs warn that Margao issue will take a different turn
गोव्यातील पराभवावर मंथन करणं आवश्यक; विजय सरदेसाई

याविषयी आपली प्रतिक्रिया देताना मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी भाजप उमेदवार पराभूत झाल्याने त्यांना पराभव पचत नाही. राजकीय फायदा घेत निर्दोष माणसांना त्रास देणे बरोबर नव्हे. लोकशाहीत कुणी कुणाला सहकार्य करावे याचा अधिकार सर्वांना आहे. पोलिसांनी कायद्या बाहेर जाऊ नये, पण विनाकारण दबावाखाली जाऊन काम करू नये.

मायकल लोबो (Michael Lobo) यांनी बोलताना कालच्या दंगलीला राजकीय (Politics) स्वरूप देण्यात आले असून हे बरोबर नव्हे. संकल्प आमोणकर यांच्या कार्यकर्त्यांना अटक करून काय साध्य करू इच्छितात हे माहित नाही. पोलिस (police) दबावाखाली येऊन काम करतात हे साध्य होते. आम्ही हा विधानसभेत आवाज उठविणार असल्याचे ते म्हणाले. गरजे शिवाय हे प्रकरण मोठे करण्याचे षड्यंत्र भाजपने रचले आहे. सावंत काय करू इच्छितो माहित नाही. त्याने लोकांच्या जीवावर खेळू नये असे ते म्हणाले. दरम्यान अटक केलेल्यांचे कुटुंबीय पोलीस स्थानकाबाहेर जमले होते. अटक सत्र अजून सुरू असून काँग्रेसच्या नेत्यांनी त्याचा निषेध केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com