Goa Politics: राणे-सावंत एकत्र; दोनापावल्यातील बैठकीत शिवप्रकाशही सहभागी, भोजनावर चर्चा

Pramod Sawant Vishwajit Rane Meeting: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि मंत्रिमंडळातील त्यांचे दुसऱ्या क्रमांकाचे सहकारी आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी एकत्रितपणे चर्चा केली.
Pramod Sawant Vishwajit Rane Meeting
Goa PoliticsDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि मंत्रिमंडळातील त्यांचे दुसऱ्या क्रमांकाचे सहकारी आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी एकत्रितपणे चर्चा केली.

आरोग्यमंत्र्यांच्या दोनापावला येथील खासगी निवासस्थानी झालेल्या या बैठकीला भाजपचे राष्ट्रीय संयुक्त संघटनमंत्री शिवप्रकाश हे देखील उपस्थित होते. या तिघांनी दुपारचे भोजनही एकत्रितच घेतले. या बैठकीत राज्यातील प्रमुख प्राधान्यक्रम, प्रशासन आणि गोव्याच्या आगामी विकासाच्या धोरणात्मक आराखड्यावर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती राणे यांनी समाजमाध्यमांवरून दिली.

Pramod Sawant Vishwajit Rane Meeting
Goa Accident: वडापाव खाऊन घरी परतताना काळाचा घाला; साकोर्ड्यात दोन अल्पवयीन मुलींचा मृत्यू

गोव्याला अधिक सक्षम, प्रगतिशील आणि समृद्ध राज्य बनविण्याच्या दृष्टीने सामूहिक प्रयत्न करण्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आल्याचे राणे यांनी संदेशात नमूद केले आहे. राज्याच्या विकासाची दिशा, प्रशासनातील प्राधान्यक्रम आणि आगामी काळातील नियोजन या विषयांवर या बैठकीत विचारविनिमय झाल्याचे त्यांच्या पोस्टवरून स्पष्ट होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.