'वास्कोतील लहान रेल्वेपुलाची उंची वाढवणार'

आमदारांची रेल्वे अधिकाऱ्यांसोबत संयुक्त बैठक, दुपदरीकरणावरही चर्चा
Vasco Railway Bridge
Vasco Railway Bridge Dainik Gomantak
Published on
Updated on

वास्को : वास्कोतील तानिया हॉटेलसमोरच्या रेल्वेच्या लहान पुलाची आधुनिक तंत्रज्ञानांचा वापर करून उंची वाढवण्यात येणार आहे. तसेच मायमोळे परिसरातील कब्रस्थान येथे शटिंग यार्डची रेल्वेमार्गापासून रूंदी कमी केली जाणार आहे. याबाबत रेल्वेचे अधिकारी राजी झाले असून रेल्वेच्या सहकार्याने वास्कोवासियांच्या काही समस्या दूर होण्यास मदत होणार असल्याचे आमदार साळकर यांनी स्पष्ट केलं आहे.

सध्या या रेल्वे पुलाची उंची 3.2 मीटर्स आहे. ती वाढवून चार किंवा अधिक करण्यात येणार असल्याचे आमदार साळकर यांनी सांगितलं आहे. दाबोळीचे आमदार आणि पंचायत मंत्री मॉविन गुदिन्हो, तसेच वास्कोचे आमदार दाजी साळकर यांनी दक्षिण पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी, सल्लागार समितीचे पदाधिकारी यांची बैठक घेतली. या बैठकीत स्थानिक समस्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी रेल्वे अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित समस्या दूर करण्याचे आश्वासन दिले आहे.

Vasco Railway Bridge
मडगाव घाऊक मासळी मार्केट चमकणार!

आमदारांनी घेतलेल्या या बैठकीत तीन महत्वाच्या गोष्टींवर चर्चा करण्यात आली. वास्कोतील (Vasco) तानिया हॉटेलसमोरच्या रेल्वे पुलाची उंची कमी असल्याने पुलाखालच्या रस्त्यावरून काही ठराविक उंचीची वाहने जाऊ शकतात. पुलाच्या वरच्या बाजूस वाहने घासून जाऊ नयेत यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूस लोखंडी अडथळे उभारण्यात आले आहेत. त्यामुळे अग्निशमन दलाचे मोठे बंब, मोठी रुग्णवाहिका आणि मोठ्या उंचीची वाहने त्याखालून जाऊ शकत नाही. त्यामुळे त्यांना सुमारे आठ किलोमीटरचा अतिरिक्त फेरा घ्यावा लागतो. यासाठी सदर पुलाची उंची वाढविण्यासंबंधी चर्चा करण्यात आली.

सध्या कोकण रेल्वे (Konkan Railways) मार्गाच्या दुपदरीकरणाचे काम चालू आहे. त्यामुळे त्या पुलाची उंची वाढविण्याचे काम हाती घेण्यात यावे यासाठी आपण मुख्यमंत्र्यांसमोर प्रश्न मांडला होता. त्यांनी त्वरित केंद्रीय रेल्वेमंत्र्यांशी संपर्क साधून याचा पाठपुरावा केला होता. यानंतर पुलाची उंची वाढविण्यासंबंधी हालचाली सुरु झाल्या होत्या. मुख्यमंत्री आणि रेल्वेमंत्र्यांच्या हस्तक्षेपामुळे रेल्वे प्रशासनाकडून चांगले सहकार्य मिळत असल्याचं आमदार दाजी साळकरांनी स्पष्ट केलं आहे.

Vasco Railway Bridge
अवकाळी पावसामुळे निम्मं पिक मातीत, बागायतदार हवालदिल

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून रेल्वे (Railway) सेवेवर कोणताही परिणाम होऊ न देता रेल्वे पुलाची उंची वाढविता येणे शक्य आहे. याबाबत आम्ही चर्चा केल्यावर रेल्वे तांत्रिक पथकाचे अधिकारी राजी झाले. रेल्वेचे अधिकारी पुलाची पाहणी करून योग्य तो अहवाल सादर करतील आणि त्यानंतरच या पुलाची उंची वाढविण्याचे काम सुरु होईल, अशी माहिती मॉविन गुदिन्हो यांनी दिली आहे.

रेल्वेमार्ग दुपदरीकरणामुळे मायमोळे येथील कब्रस्थानातील काही थडग्यांना हानी पोहचण्याची शक्यता आहे. यासंबंधी चर्चा करून सुवर्णमध्य काढण्यास गुदिन्हो यांना यश आलं आहे. तेथे शटिंग यार्डची उभारणी करताना सध्याच्या रेलमार्गापासून 1.73 मीटर जागेवर यार्ड बांधण्यात आल्यास काही थडग्यांची हानी होणार आहे. यासंबधी काही मुस्लिम बांधवांनाही चर्चेसाठी बोलाविण्यात आले होते. त्या बांधवांनी सदर यार्डची रुंदी कमी करून 1.60 ठेवल्यास कबरींची हानी होण्याचा प्रश्न निकालात येईल असं सुचवलं. चर्चेअंती रेल्वे अधिकारी रुंदी कमी करण्यास राजी झाले असून याचीही तांत्रिक पथक पाहणी करणार असल्याचं गुदिन्हो यांनी स्पष्ट केलं आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com