मडगाव घाऊक मासळी मार्केट चमकणार!

13 कोटींची निविदा जारी: कोल्ड स्टोरेज, मासळी चाचणी प्रयोगशाळेचीही सुविधा
Margao wholesale fish market to shine
Margao wholesale fish market to shineDainik Gomantak
Published on
Updated on

सासष्टी: मडगाव मधील घाऊक मासळी मार्केटच्या उद्धाराची प्रतीक्षा संपल्यातच जमा आहे. पुढील एका वर्षात गोव्यातील हे एकमेव घाऊक मासळी मार्केट नव्याने झळाळताना दिसेल. मत्स्योद्योग खात्याने जीएसआयडीसीमार्फत येथे आधुनिक घाऊक मासळी मार्केट उभारण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. या प्रकल्पात कोल्ड स्टोरेज व्यवस्था व मासळी चाचणी प्रयोगशाळेचीही व्यवस्था असेल. गोवा राज्य साधनसुविधा विकास महामंडळाने या कामासाठी 13 कोटी रुपयांची निविदा जारी केली आहे.

एरव्ही सध्याच्या घाऊक मासळी मार्केटच्या बाजूला असलेल्या जागेत नवी इमारत बांधण्यासाठी 12 जून 2018 रोजी पायाभरणी केली होती. मात्र, गेल्या चार वर्षांत या कामाबद्दल काहीच हालचाल झालेली नाही. मात्र, आता नवी इमारत उभारणीच्या कामाला गती आली आहे.

Margao wholesale fish market to shine
नोकरभरतीत राजकीय हस्तक्षेप नको: पी.एस.श्रीधरन पिल्लई

या कामासाठी केंद्र सरकारने मंजूर केलेल्या 50 कोटी रुपयांचा वापर केला जाईल. मत्स्योद्योग खाते, गोवा राज्य साधनसुविधा विकास महामंडळ व एसजीपीडीए यांनी त्रिपक्षीय सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्याचे कळते. तसेच हे मार्केट एसजीपीडीए मार्फत चालविले जाईल.

ही मार्केट इमारत लवकरात लवकर बांधून पूर्ण करण्याचा संकल्प तिन्ही पक्षांनी केला आहे. बिट्स पिलानीने सध्याच्या मार्केटमध्ये ‘एफ्लुएंट ट्रिटमेंट प्लांट’ सुरू केले असून त्याचाच उपयोग मार्केटमधील सांडपाणी, कचरा वगैरेची विल्हेवाट लावण्यासाठी केला जाईल. खराब मासळीची विल्हेवाट लावण्यासाठी ‘डायजेस्टर’चीही व्यवस्था केली जाईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com