Farming in Goa
Farming in GoaDainik Gomantak

अवकाळी पावसामुळे निम्मं पिक मातीत, बागायतदार हवालदिल

दक्षिण गोव्यातील पिकांचं मोठं नुकसान, ढगाळ वातावरणामुळे संकट कायम

पणजी : गोव्यात अवकाळी पावसामुळे उन्हाळी पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. यासोबतच काजू, आंबे, फणस आदी पिकांनाही पावसाची झळ बसली आहे. जवळपास निम्म्याहून अधिक पिक पाण्यात गेलं असून सरकारने मदतीचा हात देण्याची मागणी आता शेतकऱ्यांमधून होताना दिसत आहे. आंबा, काजू पिकांचं नुकसान झाल्याने त्यांच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. (Farming in Goa News Updates)

Farming in Goa
म्हापसा नगरसेवकाचे बांधकाम पाडण्याचा आदेश

गोव्यात एप्रिल महिन्यात अवकाळी पावसाने (Rain) धुमाकूळ घातला आहे. या पावसामुळे जवळपास हातातोंडाशी आलेल्या निम्म्या पिकाचं नुकसान झालं आहे. मोहोर झडून गेला असून, आंबा काजू पिकांचंही मोठं नुकसान झालं आहे. काही ठिकाणी वादळी वाऱ्यांमुळे आंबे पडून नुकसान झालं आहे, तर काही ठिकाणी पावसामुळे आंब्यावर काळे डाग पडल्याने पिक धोक्यात आलं आहे.

Farming in Goa
आगशी येथे चोरट्याकडून वाहने जप्त; दोन साथीदार फरार

गोव्यात (Goa) उन्हाळी पिकंही मोठ्या प्रमाणात घेतली जातात. पावसामुळे ही पिकंही मातीमोल झाल्याचं चित्र आहे. सासष्टीतील मायणा, कुडतरी, बेताळबाटी, चांदरसारख्या भागात शेतकऱ्यांचं सर्वाधिक नुकसान झालं आहे. अवकाळी पावसासह वेगवान वादळी वाऱ्यांमुळे बागायती पिकांचं नुकसान झालं आहे. कोरोना (Corona) लॉकडाऊननंतर बागायतदार शेतकऱ्यांना चांगल्या पिकाची अपेक्षा होती, मात्र पावसाने हाताशी आलेलं पीक नेल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये आहे. काही ठिकाणी पिकांची लागवड लवकर करण्यात आली होती, त्याठिकाणच्या पिकाचं नुकसान कमी झाल्याचं कृषी अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com