गोव्यातील बेपत्ता अल्पवयीन मुलगी दिल्लीत सापडली, वास्को पोलिसांची धडक कारवाई; तांत्रिक तपासाच्या जोरावर सुखरुप सुटका

Missing Girl Traced: गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असलेल्या या मुलीचा चक्क देशाची राजधानी दिल्लीतून शोध घेण्यात आला असून तिला सुखरुप तिच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले.
Minor Girl Kidnapped Margao
Goa missing girl found in DelhiDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: वास्को पोलिसांनी आपल्या कार्यक्षमतेचा प्रत्यय देत एका 16 वर्षीय बेपत्ता मुलीचा शोध घेण्यात यश मिळवले. गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असलेल्या या मुलीचा चक्क देशाची राजधानी दिल्लीतून शोध घेण्यात आला असून तिला सुखरुप तिच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले. पोलिसांच्या या वेगवान आणि समन्वित कारवाईमुळे पालकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, 16 डिसेंबर 2025 रोजी वास्को येथील मंगूर हिल परिसरातील सरकारी हायस्कूलजवळून ही 16 वर्षीय मुलगी (Girl) बेपत्ता झाली होती. मुलगी घरी न परतल्याने तिच्या वडिलांनी तातडीने वास्को पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली होती. मुलीचे वय आणि प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 137 आणि गोवा चिल्ड्रन्स ॲक्टच्या कलम 8 अंतर्गत गुन्हा दाखल करुन तपासाला सुरुवात केली होती.

Minor Girl Kidnapped Margao
Goa Crime: भुतेभाटमध्ये चोरीचा थरार! 5 जणांच्या टोळीचा डल्ला मारण्याचा 'प्लॅन' फसला; एकाला रंगेहात पकडलं, 4 जण पसार

तपासाची चक्रे दिल्लीपर्यंत

या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलीस निरीक्षक (PI) वैभव डी. नाईक आणि पोलीस निरीक्षक जॉन फर्नांडिस यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष पथक तयार करण्यात आले. या पथकाचे नेतृत्व पोलीस उपनिरीक्षक मयूर केतन सावंत यांच्याकडे सोपवण्यात आले होते. तपासादरम्यान पोलिसांना तांत्रिक माहितीच्या आधारे काही महत्त्वपूर्ण धागेदोरे मिळाले, ज्यावरुन मुलगी दिल्लीत असण्याची दाट शक्यता निर्माण झाली. त्यानंतर वेळ वाया न घालवता पोलिसांचे पथक तात्काळ दिल्लीला रवाना झाले.

Minor Girl Kidnapped Margao
Goa Crime: पर्वरीमध्ये 6 वर्षांच्या चिमुकलीचा विनयभंग! स्कूल व्हॅन चालकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या; 'POCSO' अंतर्गत गुन्हा दाखल

तांत्रिक देखरेख आणि गुप्त माहितीचा वापर

दिल्लीत (Delhi) पोहोचल्यानंतर वास्को पोलिसांनी तेथील स्थानिक पोलिसांच्या मदतीने 'टेक्निकल सर्व्हिलन्स' आणि स्थानिक गुप्त माहितीचा प्रभावीपणे वापर केला. अत्यंत चिकाटीने आणि कौशल्याने केलेल्या या शोधमोहिमेत मुलीचे नेमके ठिकाण शोधण्यात पोलिसांना यश आले. मुलीची सुरक्षा सुनिश्चित केल्यानंतर सर्व आवश्यक कायदेशीर प्रक्रिया दिल्लीतच पूर्ण करण्यात आल्या.

Minor Girl Kidnapped Margao
Goa Crime: 17 कोटींचा केला घोटाळा, नाव बदलून राहिला गोव्यात; 12 वर्षे फरार असलेल्या पुण्यातील संशयिताच्या आवळल्या मुसक्या

कुटुंबीयांशी झाली भेट

मुलीला दिल्लीतून सुखरुप गोव्यात आणल्यानंतर सर्व कायदेशीर सोपस्कार पार पाडून तिला तिच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. आपल्या मुलीला पुन्हा सुखरुप पाहून पालकांनी पोलिसांच्या कामगिरीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. वास्को पोलिसांच्या या तत्परतेमुळे पुन्हा एकदा पोलीस दलाची प्रतिमा उंचावली असून 'अल्पवयीन मुलांच्या सुरक्षेसाठी पोलीस सदैव सज्ज आहेत' हा संदेश या कारवाईतून गेला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com