Goa Crime: 17 कोटींचा केला घोटाळा, नाव बदलून राहिला गोव्यात; 12 वर्षे फरार असलेल्या पुण्यातील संशयिताच्या आवळल्या मुसक्या

Ashutosh Pandit bank fraud: १२ वर्षे फरार असलेल्या १७ कोटींच्या बँक फसवणूक प्रकरणातील मुख्य संशयित आशुतोष पंडित याला अखेर केंद्रीय तपास यंत्रणेने अटक केली.
Arrest
ArrestDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: तब्बल १२ वर्षे फरार असलेल्या १७ कोटींच्या बँक फसवणूक प्रकरणातील मुख्य संशयित आशुतोष पंडित याला अखेर केंद्रीय तपास यंत्रणेने अटक केली.

पुण्यातील हाऊस ऑफ लॅपटॉप्स (इंडिया) प्रा. लि. या कंपनीचा संचालक असलेला आशुतोष बांबोळी परिसरात यतीन शर्मा हे बनावट नाव धारण करून राहात होता.

मात्र, अत्याधुनिक डिजिटल विश्लेषण आणि गुप्तचर यंत्रणांच्या समन्वयाने ‘सीबीआय’ने ही कारवाई करत आर्थिक गुन्हेगारी विश्‍वातील या चतुर ‘लखोबा लोखंडे’ला अखेर गजाआड केले. आशुतोष कळंगुट येथील एका नाईट क्लबमध्ये सीईओ होता.

Arrest
Goa Crime: सोन्याचे दागिने हिसकावले, आरोपीला 3 महिन्यांची शिक्षा; चौकशी अधिकाऱ्यालाही काढले वॉरंट

ओळख पुसण्याचा होता त्याचा डाव

आशुतोषने केवळ लपण्याचा नव्हे, तर स्वतःची ओळखच पुसून टाकण्याचा डाव आखला होता. यतीन शर्मा या नावाने त्याने गोव्यात नव्याने पॅन कार्ड, आधार कार्ड आणि पासपोर्टही मिळवला. पहिला पासपोर्ट नवी दिल्ली, नंतर गोव्यात नूतनीकरण करून त्याने ओळख बळकट केली. गोव्यात आल्यानंतर त्याने सामाजिक वावर अत्यंत कमी ठेवला. एप्रिल २०१८ मध्ये पुण्यातील सीबीआय विशेष न्यायालयाने त्याला फरार घोषित केले होते.

Arrest
Goa Crime: 2024 साली संपला व्हिसा, तरी गोव्यात भाड्याच्या खोलीत मुक्काम; 2 परदेशी नागरिकांची न्यायालयीन कोठडीत रवानगी

अत्युच्च तंत्रज्ञानामुळे कारनामा उघड:

तंत्रज्ञानावर आधारित तपासामुळे अखेर आशुतोषच्या या बनावट कारनाम्याचा अंत झाला. ‘नेटग्रीड’ या गुप्तचर प्रणालीने विविध डेटाबेसमधील माहिती एकत्र करत यतीन शर्माची माहिती गोळा केली. विविध राज्यांमधील कागदपत्रे, प्रवास तपशील आणि बायोमेट्रिक माहिती यांच्या अभ्यासातून यतीन शर्मा म्हणजेच फरार आशुतोष असल्याचे स्पष्ट झाले. या तांत्रिक माहितीनंतर सीबीआयने १८ डिसेंबर रोजी बांबोळी येथे छापा टाकून त्याला अटक केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com