Goa Crime: भुतेभाटमध्ये चोरीचा थरार! 5 जणांच्या टोळीचा डल्ला मारण्याचा 'प्लॅन' फसला; एकाला रंगेहात पकडलं, 4 जण पसार

Bhutebhat theft: भुतेभाट परिसरात एका बंद घराचे कुलूप तोडून चोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या पाच जणांच्या टोळीपैकी एकाला स्थानिक नागरिकांनी धाडसाने रंगेहात पकडले.
Goa Crime
Goa CrimeDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: भुतेभाट परिसरात सध्या भीतीचे आणि चिंतेचे वातावरण पसरले आहे. एका बंद घराचे कुलूप तोडून चोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या पाच जणांच्या टोळीपैकी एकाला स्थानिक नागरिकांनी धाडसाने रंगेहात पकडले. मात्र, त्याचे इतर चार साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भुतेभाट येथील एक कुटुंब गेल्या पाच दिवसांपासून कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. घर रिकामे असल्याची पूर्वकल्पना असलेल्या चोरट्यांच्या टोळीने मंगळवारी रात्री या घरावर डल्ला मारण्याचे नियोजन केले होते.

पाच जणांची ही टोळी अत्यंत तयारीने आली होती. घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. , परिसरात असलेल्या काही सतर्क नागरिकांना संशयास्पद हालचाली जाणवल्या.

Goa Crime
Goa ZP Election Result: 'जनतेने भाजप सरकार, मोदींवरील विश्‍‍वास पुन्‍हा सार्थ ठरवला'! CM सावंतांचे प्रतिपादन; भाजपचा विजयोत्सव

काहीतरी अघटित घडत असल्याचे लक्षात येताच, स्थानिक रहिवाशांनी एकत्र येऊन घराला वेढा घातला. नागरिकांचा सुगावा लागताच चोरट्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान झालेल्या झटापटीत ग्रामस्थांनी एका चोराला घट्ट पकडून ठेवले, तर त्याचे इतर चार साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाले.

Goa Crime
Goa Politics: गोविंद गावडेंच्या बालेकिल्ल्याला तडा! अपक्ष जल्मी विजयी; खांडोळ्यात नेते निष्प्रभ - कार्यकर्ते निर्णायक

पकडलेला तरुण मडगाव परिसरातील रहिवासी असल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. संतप्त नागरिकांनी त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. पकडलेल्या संशयिताकडून त्याच्या फरार साथीदारांची माहिती काढण्याचे काम सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com