Uday Bhembre: "शिवरायांचे ध्येय गोवा मुक्तीचेच होते" शिवव्याख्याते ॲड. देसाईंचे भेंब्रेंना सडेतोड उत्तर

Uday Bhembre On Shivaji Maharaj: शिवरायांचे ध्येय आणि उद्दिष्ट हे पोर्तुगीज राजवटीतून गोवा पूर्णपणे मुक्त करण्याचे होते
Valpoi Goa News
Valpoi Goa News Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Uday Bhembre Controversial Statement on Shivaji Maharaj

वाळपई: पोर्तुगिजांच्या जुलमी राजवटीतून गोवा मुक्त करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि आणि त्यांचे सुपुत्र शंभूराजे यांनी प्रचंड मोठे प्रयत्न केले. शिवरायांचे ध्येय आणि उद्दिष्ट हे पोर्तुगीज राजवटीतून गोवा पूर्णपणे मुक्त करण्याचे होते. जर शिवराय जिवंत असते, तर गोवा पोर्तुगिजांच्या तावडीतून तेव्हाच मुक्त झाला, असता असे प्रत्युत्तर गोव्यातील शिवव्याख्याते ॲड. शिवाजी देसाई यांनी साहित्यिक उदय भेंब्रे यांनी शिवरायांच्या गोव्यातील एकूण इतिहासाविषयी प्रसारित केलेल्या वक्तव्यासंदर्भात बोलताना दिले.

दरम्यान, ॲड. उदय भेंब्रे यांनी ऐतिहासिक तथ्ये डावलून छत्रपती शिवाजी महाराजांसदर्भात केलेल्या आक्षेपार्ह आणि खोडसाळ वक्तव्याचा मी निषेध करतो. भेंब्रेंनी असे वक्तव्य करून इतिहासाशी द्रोह केला आहे, असे सुभाष वेलिंगकर म्हणाले. सध्या लेखक उदय भेंब्रे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्यावरुन गोव्यात वादाला तोंड फुटले आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी इतिहास म्हणत केलेला दावा खोटा असल्याचे मत भेंब्रे यांनी नोंदवले होता आणि यानंतर राज्यात वेगेवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.

साहित्यिक उदय भेंब्रे यांच्या वक्तव्यानंतर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी (२८ फेब्रुवारी) रात्री भेंब्रे यांच्या घराबाहेर गर्दी करत त्यांनी माफी मागावी अशी मागणी केली आणि यानंतर उदय भेंब्रे यांच्या समर्थनात साहित्यिक आणि राजकीय नेते मैदानात उतरले.

Valpoi Goa News
Uday Bhembre: 'ज्‍येष्‍ठ नागरिकाला अशाप्रकारे धमकावणे ही गुंडगिरी'! उदय भेंब्रे प्रकरणावरून विजय सरदेसाईंचे आरोप

भेंब्रे यांनी गोव्यात शिवशाही होती, आणि शिवरायांमुळे धर्मांतरणाला चाप बसला या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानांचे खंडन करत तो इतिहास खोटा असल्याचे म्हटले होते. यावरुन संतप्त बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी रात्री भेंब्रे यांच्या घराबाहेर गर्दी करत निदर्शने केली.

बजरंग दलाचे राज्य संयोजक विराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी भेंब्रे यांच्या घराबाहेर निदर्शने केली. तसेच, भेंब्रे यांनी माफी मागावी अशी मागणी केली. रात्री उशीरा घडलेल्या प्रकारानंतर राज्यातील साहित्यिक आणि नेत्यांनी भेंब्रे यांची भेट घेत त्यांना समर्थन दिले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com