Goa: दोन तास नव्हे चोवीस तास इन्टरनेट सेवा; जीत आरोलकर

असे आवाहन मगोचे (Mago) नेते जीत आरोलकर (Jit Arolkar) यांनी मोरजी (Morjim) येथील विध्याप्रसारक हायस्कूल सभाग्रहात विधार्थ्यासाठी मोफत चोवीस तास व्हायफाय इन्टरनेट सेवेचा शुभारंभ केल्यानंतर ते बोलत होते .
दोन तास नव्हे चोवीस तास इन्टरनेट सेवा ; जीत आरोलकर
दोन तास नव्हे चोवीस तास इन्टरनेट सेवा ; जीत आरोलकरDainik Gomantak

मोरजी - विधार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याकडे कुणी खेळू नये किंवा राजकारणाचा त्याला रंग लावू नये , जे सरकारला जमत नसेल तर ते काही सामाजिक कार्यकर्त्ये सुविधा पुरवतात ,त्याचे स्वागत करण्याऐवजी त्याच्यावर टीका करणाऱ्यांनी अगोदर चोवीस तास सेवा उपलब्ध करून द्यावी , केवळ दोन तास इन्टरनेट सेवा देवून विध्र्थ्याना वेठीस धरू नये ,असे आवाहन मगोचे (Mago) नेते जीत आरोलकर (Jit Arolkar) यांनी मोरजी (Morjim) येथील विध्याप्रसारक हायस्कूल सभाग्रहात विधार्थ्यासाठी मोफत चोवीस तास व्हायफाय इन्टरनेट सेवेचा शुभारंभ केल्यानंतर ते बोलत होते. (Twenty-four hour internet service, not two hours)

मोरजी विध्याप्रसारक समाज शिक्षण संस्थेच्या सभागृहात ३ रोजी आयोजित केलेल्या कार्यक्रमात शिक्षण संस्थेचे चेरमेन विश्राम शेटगावकर , मुख्याध्यापक दिलीप मेथर , सचिव प्रकाश शेटगावकर , संतोष शेटगावकर , उदर्गत संस्थेच्या मांद्रे मतदार महिला अध्यक्षा वंदना शेटगावकर , मोरजी अध्यक्षा प्राची भिवशेट , अनंत शेटगावकर , पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष संजय सावंत , सदस्य संजय दाभोलकर ,आदी उपस्थित होते.

दोन तास नव्हे चोवीस तास इन्टरनेट सेवा ; जीत आरोलकर
हिम्मत असेल तर भुमिपुत्र यात्रा अडवून दाखवा; गोवा कॉंग्रेस

मगोचे नेते जीत आरोलकर यांनी पुढे बोलताना विधार्थ्याच्या शिक्षणावर इंटरनेट सेवे अभावी शिक्षण राहू नये , सरकार हि सेवा उपलब्ध करण्यासाठी अपयशी ठरले , मात्र काही सामाजिक कार्यकर्त्ये किंवा मागो पक्ष विधार्थ्याना हि सेवा पुरवत आहे , तर राजकर्त्यांच्या पोटात का दुखते असा सवाल उपस्थित करून आपण मागोतर्फे दोन तास नव्हे तर चोवीस तास सेवा कार्यरत केली आहे त्याचा लाभ घेवून चांगले शिक्षण घेण्याचे आवाहन केले. सूत्रसंचालन आणि स्वागत सुरज नाईक यांनी केले .गुंजन शेटगावकर , विक्रम शेटगावकर , स्वाती परब, आदींनी पाहुण्याचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.

दोन तास नव्हे चोवीस तास इन्टरनेट सेवा ; जीत आरोलकर
मच्छीमारी ट्रॉलर्स गोव्याच्या किनाऱ्यावरच

सचिव प्रकाश शेटगावकर यांनी बोलताना विधार्थ्यांची गैरसोय लक्षात घेवून इन्टरनेट सेवा उपलब्ध करून दिली आहे त्याबद्दल समाधान व्यक्त करून ,विधार्थ्यांची नाळ ओळखून जीत आरोलकर यांनी २४ तास इन्टरनेट सेवा उपलब्ध करून दिली ,या सेवेला विधार्थ्यांनी योग्य तो वापर करून शिक्षण घेण्याचे आवाहन केले .

संतोष शेटगावकर यांनी बोलताना इंटरनेट सेवा ग्रामीण भागात विस्कळीत होती , याची जाणीव ठेवून जीत आरोलकर यांनी हि सेवा उपलब्ध केली , या हायस्कूल साठी जीत आरोलकर यांचे मोठे सहकार्य मिळाले . ते याही पुढे मिळावे असे त्यांनी सांगितले . शेवटी वंदना शेटगावकर यांनी आभार मानले .

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com