हिम्मत असेल तर भुमिपुत्र यात्रा अडवून दाखवा; गोवा कॉंग्रेस

भाजपा ही भारतीय जुमला पूत्र पार्टी झाल्याचा आरोप करून भुमिपुत्र विधेयकाच्या विरोधात गोवेकर सक्रिय झाल्याचे चोडणकर म्हणाले.
गोवा कॉंग्रेस
गोवा कॉंग्रेसDainik Gomantak
Published on
Updated on

गोवा प्रदेश कॉंग्रेस (Goa Congress) समीती येत्या 15 दिवसांत साखळीत 10 हजार लोकांना घेऊन भुमिपुत्र (Bhumiputra Yatra) यात्रा काढणार आहे. हिम्मत असल्यास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांनी ती अडवून दाखवावी. असे आव्हान प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर (Girish Chodankar) यांनी आज मुख्यमंत्र्यांना दिले. पणजी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत चोडणकर बोलत होते. परवा साखळीत कॉंग्रेसच्या सदबुध्दी यात्रेविरुध्द भिजपने केलेले शक्तप्रदर्शन जिव्हारी लागल्यामुळे चोडणकर आज बरेच आक्रमक झाल्याचे दिसून आले. भाजपा ही भारतीय जुमला पूत्र पार्टी झाल्याचा आरोप करून भुमिपुत्र विधेयकाच्या विरोधात गोवेकर सक्रिय झाल्याचे चोडणकर म्हणाले. (Goa Pradesh Congress Committee will organize a Bhumiputra Yatra with 10,000 people)

गोवा कॉंग्रेस
राज्यपालांनी गोवा भूमिपुत्र कायद्याला संमती देवू नये; आप

गोवा सरकारने विधानसभेमध्ये कोणतीही चर्चा न करता महत्त्वाची जी विधायके संमत केली आहेत त्या विधेयकांना राज्यपालांनी मान्यता देऊ नये. अशी मागणी या पत्रकार परिषदेत उपस्थित असलेले विरोधी नेते दिगंबर कामत यांनी केली. कामकाज सल्लागार समितीने किमान दहा दिवसाचे विधानसभा अधिवेशन घेण्याची शिफारस केली होती . मात्र गोवा सरकारने फक्त तीन दिवसांचे अधिवेशन घेतले. शुक्रवार हा खाजगी ठरावांचा दिवस असताना त्या दिवशी महत्त्वाची असलेली विधेयके मांडून विरोधक विधानसभेत उपस्थित नसताना त्यावर चर्चा न करता ती संमत करण्यात आली हे चुकीचे असल्याचे कामत यांनी यावेळी सांगितले. सदर विधेयके महत्त्वाची असल्यामुळे ती विधानसभा चिकित्सक समितीकडे पाठवावी असेही कामत म्हणाले.

गोवा कॉंग्रेस
Goa: भूमिपुत्र विधेयकामागे भाजपचा डाव

झोपडपट्टीतील लोकांना भूमिपुत्र करण्याचा प्रयत्न भाजपा सरकारने या भूमिपुत्र विधेयकातून केलेला असून हे विधेयक आणण्याची प्रक्रिया नियमबाह्य असल्याचे टीका काँग्रेसचे कायदा सल्लागार एड. कार्लोस अल्वारिस फेरेरा यांनी यावेळी केली.

कोमुनिदाद कायद्याचा भंग या विधेयकांच्या माध्यमातून होणार असल्याने सांगून फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे विधेयक संमत केल्याचे अल्वारिस म्हणाले. तर प्रवक्ते तुलियो डिसोजा यांनी विधानसभा ही चर्चेसाठी असून सरकारी कायद्यांची नियमांची पायमल्ली करून भाजप सरकारने विधेयके संमत केल्याचा आरोप केला. राज्यातील विविध घटकांकडून भूमिपुत्र विधेयकाला विरोध होत असल्याचे सांगून त्याचा लाभ कुणालाही मिळणार नाही असा दावा डिसोजा यांनी यावेळी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com