Tuyem Health Centre: तुये आरोग्य केंद्रातील कामे पूर्ण करा; नागरिक कृती समितीतर्फे आरोग्य विभागाला निवेदन

Tuyem Health And Research Centre: आरोग्य केंद्राच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ असलेली जुनी पाण्याची टाकी धोकादायक स्थितीत असून, त्यावर उपाययोजना करण्यात यावी.
Tuyem Health And Research Centre
Tuye Health CentreDainik Gomantak
Published on
Updated on

पेडणे: तुये आरोग्य आणि संशोधन केंद्रातील उर्वरित कामे लवकर पूर्ण करावीत व आवश्यक सोयी-सुविधा पुरविण्यात याव्यात, अशी मागणी तुये हॉस्पिटल नागरिक कृती समितीतर्फे समितीचे निमंत्रक जुझे लोबो यांनी सहसचिव, आरोग्य सेवा विभाग, गोवा शासन, पर्वरी यांना सादर केलेल्या निवेदनातून केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, आरोग्य केंद्रात गॅस पाइपलाइन बसविण्याचे मुख्य काम पूर्ण झाले आहे. तथापि, अंतिम फिनिशिंगचे काम, चाचणी आणि कार्यान्वयन अद्याप बाकी आहे. ही सुविधा पूर्णपणे कार्यान्वित करण्यासाठी ही उर्वरित कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत.

Tuyem Health And Research Centre
देशात कुठेही चालणार 'डीडीएसएसवाय'! पहिले डिजिटल आरोग्य राज्य बनण्याचे गोवा सरकारचे लक्ष्य

शस्त्रक्रिया कक्षातील काम सध्या सुरू आहे. परंतु, कामाची गती खूपच मंद आहे. सध्याच्या प्रगतीनुसार ते पूर्ण होण्यासाठी आणखी ४ ते ५ महिने लागू शकतात. रुग्णांसाठी शस्त्रक्रिया सुविधांचे महत्त्व लक्षात घेऊन कामाला गती देण्यात यावी.

आरोग्य केंद्राच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ असलेली जुनी पाण्याची टाकी धोकादायक स्थितीत असून, त्यावर उपाययोजना करण्यात यावी. तसेच, केंद्रावर एक पोलिस चौकी किंवा काउंटर स्थापन करण्यात यावा, जेणेकरून परिसराची सुरक्षितता सुनिश्चित होईल आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा आत्मविश्वास वाढवणारे सुरक्षित वातावरण निर्माण होईल, असे शेवटी लोबो यांनी निवेदनात म्हटले आहे.

Tuyem Health And Research Centre
Goa Health Insurance: "प्रत्येक गोमंतकीय कुटुंबाला 10 लाखांचा हेल्थ इन्शुरन्स द्या", 'आप'ची मुख्यमंत्र्यांकडे मागणी, चर्चेसाठी मागितला वेळ

अनियमित डॉक्टर सेवा

गोवा वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्रतिनियुक्तीवर आलेल्या डॉक्टरांची सेवा नियमित नसल्यामुळे केंद्राला भेट देणाऱ्या बाह्यरुग्णांची गैरसोय होत आहे. अपेक्षित वेळापत्रकानुसार डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. डॉक्टरांची सेवा अखंडितपणे सुरू राहावी, यासाठी जीएमसी प्रशासनासोबत नियमित देखरेख आणि समन्वय असणे आवश्यक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com