'पर्रीकरांच्या काळात असं नव्हतं, आत्ताच्या गोवा सरकारमध्ये सगळे हफ्ते मागतायेत'; माजी भाजप मंत्र्याचा गंभीर आरोप, केजरीवालांनी शेअर केला व्हिडिओ

Goa politics latest news: भाजपमधूनच सत्य बाहेर येत असताना, भाजपने संपूर्ण व्यवस्थेला भ्रष्ट आणि बेईमान केले आहे हे स्पष्ट होते", असे अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे.
Dilip Parulekar allegations
Dilip ParulekarDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: भाजपच्या माजी मंत्र्याने राज्यातील सरकारावर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे विद्यमान सरकार अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. एका टीव्ही शोमध्ये चर्चा करत असताना माजी मंत्री दिलीप परुळेकर यांनी राज्य सरकारमधील सर्वजण हफ्ते मागत असल्याचा आरोप केला आहे. या व्हिडिओमुळे आप नेते अरविंद केजरीवाल यांनी भाजप सरकारवर निशाणा साधण्याची आयती संधी मिळाली.

बर्च बाय रोमिओ लेनमध्ये लागलेल्या आगीत २५ जणांचा मृत्यू झाला. या घटनेवरुन राज्यातील अवैध व्यवसाय, बेकायदेशीर नाईटक्लब, डान्स क्लब यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याबाबत एका हिंदी वृत्तवाहिनीवर आयोजित चर्चेत भाजपचे माजी नेते दिलीप परुळेकर सहभागी झाले होते.

यावेळी परुळेकरांनी राज्यातील सध्याच्या भाजप सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. मनोहर पर्रीकरांच्या काळात असणाऱ्या सरकारमध्ये असे होत नव्हते असेही परुळेकर यावेळी बोलताना म्हणाले.

Dilip Parulekar allegations
गोव्यात पोट भरणाऱ्या महाराष्ट्रातील तरुणावर प्राणघातक हल्ला; झारखंडच्या संशयिताला पणजीत अटक

आप नेते अरविंद केजरीवाल यांनी परुळेकरांनी केलेल्या आरोपांच्या आधारावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. "राज्यात इतके भ्रष्ट सरकार कधीच पाहिले नाही, असे भाजपचे वरिष्ठ नेते उघडपणे मान्य करत आहेत. सर्वत्र खंडणी, पावला - पावलावर भ्रष्टाचार. भाजपच्या दोन मंत्र्यांनी यापूर्वी त्यांच्याच सरकारवर गंभीर आरोप केले आहेत आणि आता आणखी एक नेता समोर आला आहे", असे केजरीवाल यांनी ट्विट केले आहे.

"भाजपमधूनच सत्य बाहेर येत असताना, भाजपने संपूर्ण व्यवस्थेला भ्रष्ट आणि बेईमान केले आहे हे स्पष्ट होते", असे अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे. केजरीवाल यांनी एका टीव्ही शोचा एक व्हिडिओ पोस्ट करत मत मांडले आहे.

Dilip Parulekar allegations
Deported! बर्च बाय रोमिओ लेनचे मालक लुथरा बंधु बँकॉकमधून डिपोर्ट; दिल्लीतून गोव्यात होणार दाखल, व्हिडिओ आला समोर Watch

दिलीप परुळेकर काय म्हणाले?

टीव्हीशोमध्ये बोलताना माजी मंत्री परुळेकर यांनी मनोहर पर्रीकरांच्या काळात सरकार चालवत असताना असं घडतं नव्हते. पण, या सरकारमध्ये सर्वत्र हफ्ते घेतले जात आहेत. अलिकडेच काही अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले. २५ निष्पाप लोकांचा बळी गेला आहे, असे दिलीप परुळेकर म्हणाले.

यापूर्वी सरकारमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप माजी मंत्री पांडुरंग मडकईकर आणि गोविंद गावडे यांनीही केला होता. आता आणखी एका भाजप मंत्र्यांने भाजपला घरचा आहेर दिल्याने सरकार अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com