गोव्यात पोट भरणाऱ्या महाराष्ट्रातील तरुणावर प्राणघातक हल्ला; झारखंडच्या संशयिताला पणजीत अटक

Goa crime news: दिनेश महाराष्ट्रातील रहिवासी असून, तो पणजीत भंगार गोळा करण्याचे काम करतो, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.
Goa Crime News
Goa Crime NewsDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोव्यात हातावर पोट भरणाऱ्या तरुणाला गंभीर मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पणजीतील जुना पाटो पूल येथे रात्री आठ वाजता ही घटना घडली. हल्ल्यात जखमी झालेला तरुण महाराष्ट्रातील रहिवासी असल्याची माहिती मिळाली असून, याप्रकरणी संशयिताला अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पणजीत तरुणावर गंभीर हल्ला करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. सोमवारी रात्री आठच्या सुमारास जुना पाटो पूल येथे ही घटना घडली. दिनेश कारंडे असे या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. दिनेश महाराष्ट्रातील रहिवासी असून, तो पणजीत भंगार गोळा करण्याचे काम करतो, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.

Goa Crime News
Deported! बर्च बाय रोमिओ लेनचे मालक लुथरा बंधु बँकॉकमधून डिपोर्ट; दिल्लीतून गोव्यात होणार दाखल, व्हिडिओ आला समोर Watch

पोलिसांनी याप्रकरणी अमनकुमार (रा. झारखंड) याला अटक करण्यात आली आहे. अमनकुमार आणि दिनेश यांच्यात कोणत्यातरी गोष्टीवरुन वाद झाला. वाद वाढत गेला आणि चिडलेल्या अमनकुमारने दिनेशवर जीवघेणा हल्ला केला.

यात दिनेश गंभीर जखमी झाला. दरम्यान, स्थानिकांनी यात हस्तक्षेप करत अमनकुमारला मारहाण करण्यापासून रोखले तसेच, पोलिस येईपर्यंत घटनास्थळावरुन पळून जाण्यास रोखले.

Goa Crime News
विरोधी पक्षांचे नेते 'नर्व्हस' की 'ओवरकॉन्फिडेंट'? स्वार्थासाठी युती तोडली, भाजपला आयती संधी!

पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर संशयित अमनकुमारला अटक करण्यात आली. तर, जखमी दिनेश कारंडेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोघांमध्ये वाद कशामुळे झाला याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. दरम्यान, पोलिस या घटनेचा सखोल तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

online investment fraud arrested
Bison Attack Death Betoda Goa
Goa Dinesh Gawade Death Case
Digital Arrest Fraud Case Goa
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com