Goa Crime: टॅक्‍सीचालकाला बाहेर ढकलले, धारदार शस्त्रांनी चढवला हल्ला; पेडणे येथील घटना, महाराष्ट्रातील 6 जणांवर गुन्हा दाखल

Taxi driver attacked in Goa: कळंगुट येथील टॅक्सीचालक संजीवन कृष्णा वेंगुर्लेकर (६५) यांच्‍यावर प्राणघातक हल्ला करून त्‍यांची गाडी चोरून नेण्‍याचा प्रयत्‍न फसला. परंतु या हल्‍ल्‍यात ते गंभीर जखमी झाले.
Crime News
Crime NewsDainik Gomantak
Published on
Updated on

पेडणे: कळंगुट येथील टॅक्सीचालक संजीवन कृष्णा वेंगुर्लेकर (६५) यांच्‍यावर प्राणघातक हल्ला करून त्‍यांची गाडी चोरून नेण्‍याचा प्रयत्‍न फसला. परंतु या हल्‍ल्‍यात ते गंभीर जखमी झाले आहेत. दरम्‍यान, या प्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्‍यात घेतले आहे. तर, अन्‍य संशयितांचा शोध घेण्‍यासाठी पोलिसांचे एक पथक महाराष्ट्रात गेले आहे.

मिळालेल्‍या माहितीनुसार, ही घटना काल बुधवारी रात्री घडली. महाराष्‍ट्रातील सहाजणांनी पर्यटन टॅक्‍सीचालक वेंगुर्लेकर यांच्‍या टॅक्‍सीने (जीए ०३ डब्ल्यू ४१८०) भाड्याने बांद्यापर्यंत जायचे आहे असे सांगितले. त्‍यानुसार वेंगुर्लेकर हे त्‍या सहाजणांना घेऊन निघाले. टॅक्सी राष्ट्रीय महामार्ग ८८ वर मालपे-पेडणे येथे सामसूम भागात पोहोचल्यावर या पर्यटकांनी टॅक्सीचालकावर प्राणघातक हल्ला चढविला.

त्‍यांचा हेतू टॅक्सी चोरून नेणे हा होता. पण वेंगुर्लेकर यांनी टॅक्सीची चावी आपल्याकडे ठेवून या चोरट्यांना प्रतिकार केला. त्‍यामुळे टॅक्सी चोरून नेण्‍याचा त्‍यांचा प्रयत्‍न फसला. पण गंभीर जखमी झालेले टॅक्‍सीचालक वेंगुर्लेकर यांना गंभीर दुखापत झाल्‍यामुळे त्‍यांना गोमेकॉत दाखल करण्‍यात आले आहे.

Crime News
Goa Crime: ‘नॅचरल आईसक्रिमची फ्रँचायझी देतो’, म्हणत गोव्यातील व्यक्तीला 4.24 लाखांचा गंडा; देशभरात 22 लाख लुबाडले

या प्रकरणी संजीवन वेंगुर्लेकर यांनी पेडणे पोलिसांत तक्रार दाखल केली. पेडणे सरकारी इस्पितळात उपचार करून नंतर त्‍यांना गोमेकॉत हलविण्‍यात आले. पेडणे पोलिसांनी फरारी संशयितांवर खुनाचा प्रयत्न व दरोडा या प्रकरणी गुन्‍हा दाखल केला आहे.

Crime News
Sawantwadi Theft: चोरट्यांचा धुमाकूळ! गोव्यात टॅक्सीचालकावर खुनी हल्ला, सावंतवाडीत घरफोडीसह दुचाकी-मोबाईलची चोरी

दुसरे वाहने आले अन्‌ हल्लेखोरांचा बेत फसला‌

संशयितांनी वेंगुर्लेकर यांना टॅक्‍सी थांबविण्‍यास भाग पाडले व त्यांना खेचून बाहेर काढले. त्‍यानंतर धारदार शस्त्रांनी त्‍यांच्‍यावर हल्ला चढविला. त्‍यात वेंगुर्लेकर यांच्‍या चेहऱ्याला, डोक्याला, डाव्या हाताला व खांद्याला गंभीर दुखापत झाली. याच वेळी महामार्गाने जाणाऱ्या एका वाहनचालकाने हा प्रकार पाहून आपले वाहन थांबवले. त्‍यामुळे हल्लेखोर पळून गेले. वेंगुर्लेकर यांनी प्रसंगावधान राखून टॅक्सीची चावी काढून आपल्या खिशात ठेवली होती. त्यामुळे टॅक्सी चोरण्‍याचा संशयितांचा प्रयत्‍न फसला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com