Goa Maleria Cases:
Goa Maleria Cases:Dainik Gomantak

Goa Maleria Cases: दक्षिण गोवा जिल्ह्याची मलेरिया मुक्तीच्या दिशेने वाटचाल; राज्यात वर्षभरात एकही रूग्ण नाही...

2021 मध्ये 90 रुग्ण आढळले होते, 2022 मध्ये रूग्णसंख्या 02 वर
Published on

Goa Maleria Cases: गोवा राज्य मलेरिया निर्मूलनाच्या टप्प्यात आहे. राज्यात या वर्षभरात मलेरियाचा एकही रूग्ण आढळून आलेला नाही. तसचे दक्षिण गोवा जिल्हा तर मलेरिया मुक्तीच्या टॅगच्या दिशेने वाटचाल करत आहे.

कारण जिल्ह्यातर्फे मलेरियाच्या प्रकरणांच्या उच्चाटन करण्यासाठी पुरस्कारासाठी अर्ज करणार आहे. दरम्यान, स्थलांतरित लोकांमध्ये मलेरियाचे रूग्ण आहेत का हे शोधणे सुरू आहे.

मलेरियाच्या उपराष्ट्रीय निर्मूलनासाठी जिल्हा समितीची पहिली बैठक शुक्रवारी मडगाव येथे झाली. त्यात परिस्थितीचा आढावा घेण्यात आला.

Goa Maleria Cases:
Goa Tourism: गोव्याच्या पर्यटनात मंदिरे दाखवा, कमी कपड्यातील महिला असलेले बीच नको; हिंदू जनजागृती समितीची मागणी

"2021 मध्ये गोव्यात मलेरियाचे 90 रुग्ण आढळले होते. परंतु सक्रिय उपायांमुळे, देखरेखीमुळे 2022 मध्ये ही प्रकरणे दोनवर आली, अशी माहिती राष्ट्रीय वेक्टर-बोर्न डिसीज कंट्रोल प्रोग्रामच्या प्रभारी उपसंचालक डॉ . कल्पना महात्मे यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे.

ही दोन प्रकरणे उत्तर गोव्यात नोंदवली गेली आहेत. कांदोळी आरोग्य केंद्रांतर्गत रेईस मागोस आणि कोलवाळ आरोग्य केंद्रातील शिरसई येथे हे रूग्ण आढळले. तसेच 2018 पासून राज्यात मलेरियामुळे एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही.

Goa Maleria Cases:
Vasco: हायवेवरील खोदकाम मुरगावच्या माजी नगराध्यक्षांनी पाडले बंद

संपूर्ण राज्याने मलेरियाचा नायनाट केल्याचे घोषित करण्याऐवजी, आरोग्य सेवा संचालनालयाने (DHS) केंद्राकडून एक सूचना स्वीकारली आहे. गोव्याच्या डेटाची तपासणी केल्यानंतर, केंद्राने सुचवले की राज्याने सबनॅशनल श्रेणीतील निर्मूलन स्थितीसाठी अर्ज करावा.

एक वर्ष किंवा तीन वर्षांत शून्य प्रकरणे असे दोन निकष आहेत. त्यातील एक वर्षाच्या कालावधीसाठी गोवा अर्ज करणार आहे. डॉ कल्पना महात्मे यांनी म्हटले आहे की, 2024 च्या अखेरपर्यंत संपूर्ण राज्यातून मलेरिया मुक्तीचे लक्ष्य आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com