Shack Business: शॅकमालकांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

Shack Business: लोबोंचा पाठिंबा : कळंगुट, कांदोळी भागातील शॅक्सची जागा बदलण्याची मागणी
Shack Business
Shack BusinessDainik Gomantak
Published on
Updated on

Shack Business: कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांच्या नेतृत्वाखाली अखिल गोवा शॅकमालक संघटनेच्या शिष्टमंडळाने वागातोर समुद्रकिनाऱ्यावरील शॅक्सची संख्या कमी करणे व कळंगुट तसेच कांदोळी येथील शॅक्सची जागा बदलणे या मुद्यांवर बुधवारी सायंकाळी म्हापशात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतली.

Shack Business
Protein Diet: उपवासामुळे थकवा येतोय? तर मग खा हे प्रथिनेयुक्त पदार्थ

शिष्टमंडळाने उपस्थित केलेल्या समस्या ऐकल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी माध्यमांना सांगितले की, शॅक धोरण जाहीर केल्यानंतर पर्यावरण विभागाने शॅकची संख्या कमी केली व अंतर वाढविले. हा मुद्दा शॅकमालकांनी उपस्थित केला. त्यानुसार, पर्यावरण पथकाने भेट देत वरील समस्येचा विचार केला आहे. त्यानुसार, पर्यावरण विभागाचा पुढे प्रश्न विचारात घेऊन त्यावर तोडगा काढला जाईल.

Shack Business
IMPS Transaction: आता क्षणात होणार लाखो रूपये ट्रान्सफर

बुधवारी, सायंकाळी कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांच्या नेतृत्वाखाली शॅकमालकांचे अध्यक्ष क्रूझ कार्दोज, जॉन लोबो, श्रीधर गोलतेकर, विद्याधर दाभोळकर व इतरांच्या शिष्टमंडळाने करासवाडा आयडीसी येथेमुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या शिष्टमंडळाने कळंगुटमधील गावरावाडा येथील शॅक्स हे सावतावडा किनाऱ्यावर हलविले. तर माडोवाडावरील शॅक्सचेही स्थलांतर केले गेले आणि कांदोळीमधील वाडी येथील शॅक्स हे दांडोमध्ये हलविले, असे सांगितले.

जीसीझेडएमएची बैठक यापूर्वीच झाली होती. त्यांनी अनेक शॅक मंजूर केले होते. परंतु, मच्छिमार ज्या जागेत त्यांचे पारंपरिक उपक्रम राबवितात, तिथे शॅक दिले गेले, अशा विसंगती होत्या. त्यामुळे आम्हाला जीसीझेडएमएला समुद्रकिनार्‍यांची पुन्हा पाहणी करण्याची आवश्यकता होती व त्यांनी आज पाहणी केली. तआम्ही मुख्यमंत्र्यांना यात हस्तक्षेप करण्यास सांगितले असून, त्यांनी ते मान्य केले.

- मायकल लोबो, आमदार

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com