IMPS Transaction: आता क्षणात होणार लाखो रूपये ट्रान्सफर

IMPS Transaction: IMPS द्वारे पैसे पाठवण्यासाठी, तुम्हाला एकतर खाते क्रमांक आणि IFSC कोड द्यावा लागेल
IMPS Transaction
IMPS TransactionDainik Gomantak

IMPS Transaction: एका खात्यातून दुसर्‍या खात्यात पैसे पाठवणार्‍या लोकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता तुमचा फोन नंबर आणि खाते क्रमांक टाकून तुम्ही लवकरच IMPS द्वारे ट्रान्सफर करू शकता. याद्वारे पैसे पाठवण्यासाठी खाते क्रमांकासह बँकेचे नाव आणि IFSC कोड द्यावा लागतो.

IMPS Transaction
Protein Diet: उपवासामुळे थकवा येतोय? तर मग खा हे प्रथिनेयुक्त पदार्थ

ही रिअल टाइम पेमेंट सेवा आहे जी दिवसाचे 24 तास, आठवड्याचे सातही दिवस काम करते. ही सेवा नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) द्वारे प्रदान केली जाते ज्याद्वारे तुम्ही त्वरित पैसे हस्तांतरित करू शकता. IMPS द्वारे दोन प्रकारचे पेमेंट केले जाते.

IMPS Transaction
Breast Cancer: आता 'ब्रा' शोधणार स्तनाचा कर्करोग!

पहिली पद्धत

यामध्ये तुम्हाला प्राप्तकर्त्याचा खाते क्रमांक, बँकेचे नाव आणि IFSC कोड द्यावा लागेल. दुसरे म्हणजे व्यक्ती ते व्यक्ती. यामध्ये तुम्हाला रिसीव्हरचा मोबाईल नंबर आणि मोबाईल मनी आयडेंटिफायर (MMID) द्यावा लागेल. MMID हा बँकेने जारी केलेला 7 अंकी क्रमांक आहे जो मोबाईल बँकिंगमध्ये प्रवेश करण्यासाठी दिला जातो.

दुसरी पद्धत

दुस-या पद्धतीत कमी तपशील द्यावयाचा असला तरी त्यासाठी दोन्ही खात्याचे एमएमआयडी आवश्यक आहे. आता नव्या पद्धतीमुळे पैसे पाठवणे अधिक सोपे होणार आहे. नवीन फीचरमध्ये तुम्हाला MMID च्या जागी फक्त फोन नंबर आणि बँकेचे नाव द्यावे लागेल. IMPS द्वारे, तुम्ही लाभार्थी न जोडता 5 लाख रुपयांपर्यंतची रक्कम पाठवू शकता.

IMPS व्यवहार कसे करावे

IMPS द्वारे व्यवहार करण्यासाठी, तुम्हाला प्रथम मोबाइल बँकिंग नोंदणी पूर्ण करावी लागेल. इंटरनेट बँकिंग, एटीएम आणि बँक शाखेतील व्यवहारांसाठी याची गरज नाही. जर तुम्हाला पैसे मिळवायचे असतील तर तुम्हाला एमएमआयडी क्रमांक घ्यावा लागेल. तुम्हाला ते पैसे पाठवणाऱ्या व्यक्तीला द्यावे लागतील. जर तुम्ही हे करू शकत नसाल तर तुम्हाला तुमचा बँक खाते क्रमांक आणि IFSC कोड द्यावा लागेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com