Goa Government: राज्य सरकार आता ‘इलेक्शन मोड’वर

Goa Government: ‘पंचायत चलो अभियान’साठी मंत्री कार्यरत
Goa Assembly
Goa AssemblyDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Government: लोकसभा निवडणूक जवळ आल्यावर राज्य सरकार निवडणूक मोडवर गेले आहे. पंचायत चलो अभियानांतर्गत 27 फेब्रुवारीपासून पुढील 10 दिवस मंत्री प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्राला तीन तासांची भेट देणार आहेत. 19 मार्च रोजी डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील सरकारला पाच वर्षे पूर्ण होणार आहेत.

मात्र, त्या दिवशी लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागू होणार असल्याने हे कार्यक्रम आधीच आयोजित केले आहेत. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी आज पर्वरी येथे मंत्रालयात पत्रकारांना सांगितले की, 19 मार्च रोजी सरकारला पाच वर्षे पूर्ण होतील. त्यावेळी निवडणूक आचारसंहिता लागू होणार असल्याने ‘विकसित भारत, विकसित गोवा’ ही मोहीम त्यापूर्वी राबवण्यात येईल.

अंत्योदय, सर्वोदय, ग्रामोदय तत्त्वावर सरकारचा कारभार चालत असून त्याचा आढावा घेत जनतेच्या समस्या गावात जाऊन सोडविण्यासाठी मंत्री एकेका मतदारसंघातील सर्व पंचायतींना भेटी देणार आहेत.

Goa Assembly
Goa Politics: ‘एसटीं’ना 2027 पूर्वी आरक्षण

दोन-तीन तास ते तेथे थांबून समस्यांचे निराकरण करतील. आवश्यक ते आदेश देतील. अनुदानांचे वाटप करतील. लोकांचे म्हणणे ते जाणून घेतील. त्यांचे स्वागत सरपंच करतील आणि जिल्हा पंचायत सदस्यही यावेळी उपस्थित राहतील.

एका मतदारसंघात एक दिवस योजनांचा आढावा, कामांची मंजुरी, अनुदान वितरण अशी कामे या दौऱ्यादरम्यान मंत्री करणार आहेत.

लॅपटॉपसह चष्मे वाटप

‘दृष्टी’ योजनेंतर्गत राज्यातील विद्यार्थ्यांच्या डोळ्यांची तपासणी केली होती. दृष्टी सुधारण्यासाठी चष्म्याची आवश्यकता असलेल्या ३० हजार विद्यार्थ्यांना चष्‍म्यांचे वाटप केले जाणार आहे. प्रातिनिधिक स्वरूपात दीड हजार विद्यार्थ्यांना ४ मार्च रोजी साखळीच्या रवींद्र भवनात चष्मे वाटप होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. शिवाय १० मार्चपूर्वी प्रत्येक तालुक्यातील अनुसूचित जाती-जमातीतील प्रत्येकी १० विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉपचे वितरण करण्यात येणार आहे. ४ मार्च रोजी ‘व्हिजन फॉर गोवा’अंतर्गत ३० हजार विद्यार्थ्यांना चष्मा वाटप होणार, रवींद्र भवनात दीड हजार वाटप होईल.

Goa Assembly
Goa Accident Death: अपघातानंतर मांडवी नदीत पडलेल्या दुचाकी चालकाचा दोन दिवसानंतर सापडला मृतदेह

40 ठिकाणी महिला मेळावे

सरकारने 8 मार्च रोजीच्या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून 7 मार्चलाच राज्यातील चाळीसही विधानसभा मतदारसंघांत एकाचवेळी 40 महिला मेळाव्यांचे आयोजन केले आहे. महिला व बाल कल्याण खाते आणि ग्रामीण विकास खात्याकडून या मेळाव्यांचे संयुक्तपणे आयोजन केले जाणार आहे.

ग्रामीण विकास खात्याकडे 1 हजार 145 महिला स्वयंसाहाय्य गट नोंद आहेत. त्या गटांना ४ कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य वितरीत केले जाणार आहे. शिवाय महिलांसाठी स्पर्धा व कृतिसत्रांचे आयोजन केले जाणार आहे. विशेष म्हणजे दृक-श्राव्य माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी या महिलांशी संवाद साधणार आहेत.

200 शेतकऱ्यांना मोफत सौरपंप वाटप

राज्याचे मुख्य सचिव, सर्व आयएएस, आयपीएस तसेच गोवा प्रशासनातील अधिकारी २ मार्च रोजी नेमून दिलेल्या पंचायतीत उपस्थित राहाणार आहेत. ते स्वयंपूर्ण मित्रांच्या मदतीने स्वयंपूर्ण मोहिमेचा आढावा घेणार आहेत. ही मोहीम पुढे नेण्यासाठी आणखी काय करायचे, याचा आढावाही घेण्यात येणार आहे. कृषी व वीज खात्याच्या संयुक्त विद्यमाने कुसुम योजनेखाली राज्यातील २०० शेतकऱ्यांना मोफत सौर पंपांचे वाटप केले जाणार आहे.

मंत्र्यांचे मतदारसंघ

  • मुख्यमंत्री : पणजी, ताळगाव.

  • विश्वजीत राणे : मुरगाव, नुवे, शिरोडा, मडकई.

  • माविन गुदिन्हो : कळंगुट, काणकोण, पेडणे, सांत आंद्रे.

  • रवी नाईक : डिचोली, वाळपई, पर्ये.

  • सुभाष शिरोडकर : सांताक्रुझ, सावर्डे, हळदोणे.

  • रोहन खंवटे : प्रियोळ, वेळ्ळी, कुडचडे, दाबोळी.

  • गोविंद गावडे : सांगे, साळगाव, कुंकळ्ळी, कुडतरी.

  • बाबूश मोन्सेरात : वास्को, मये, मडगाव.

  • सुदिन ढवळीकर : म्हापसा, साखळी, कुठ्ठाळी.

  • नीळकंठ हळर्णकर : फातोर्डा, फोंडा, कुंभारजुवे.

  • सुभाष फळदेसाई : मांद्रे, पर्वरी, थिवी.

  • आलेक्स सिक्वेरा : नावेली, बाणावली, केपे, शिवोली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com