Goa Accident Death: पणजी मांडवी किनारी एक मृतदेह पाण्यात तरंगताना आढळला दरम्यान, हा मृतदेह मोटारसायकल चालक जावेद सडेकरचा याचा असून पोलिसांनी हा मृतदेह बाहेर काढला याबाबत पुढील तपास चालू आहे.
गुरुवारी जुन्या मांडवी पुलावर झालेल्या अपघातातील मोटारसायकल चालक जावेद सडेकरचा याच्या मृतदेहाचा शोध गेले दोन दिवस चालू होता.
नदीत बुडालेल्या हळदोणे येथील मोटारसायकल चालक जावेद सडेकर याचा मृतदेह जुन्या सचिवालयाजवळील नदीच्या काठाला आज सकाळी तरंगताना सापडला त्यामुळे संशयित अंकित त्रिपाठी याच्या विरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा पणजी पोलिसांकडून दाखल करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.
संशयित कार चालकाने मद्यप्राशन केल्याचे तपासणीत उघड
संशयित मद्यप्राशन केल्याचे रक्त तपासणीत उघड झाले आहे. दरम्यान न्यायालयाने काल त्याला तीन दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे. तसेच त्याने जामिनासाठी केलेल्या अर्जावर येत्या सोमवारी सुनावणी ठेवण्यात आली आहे
पणजीतील जुन्या मांडवी पुलावर गुरुवारी भरवेगाने जाणाऱ्या रेंट अ कारने विरुद्ध दिशेला जात समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेने नास्नोळा-हळदोणा येथील 38 वर्षीय जावेद सडेकर हा हवेत उसळून थेट मांडवी नदीत कोसळला होता.
मात्र, जावेद हा मनमिळावू तसेच कष्टाळू तरुण होता, असे त्याचा मित्रपरिवार तसेच शेजाऱ्यांनी सांगितले. त्याच्या मृत्युनंतर अनेकांनी शोक व्यक्त केला. जावेदला तीन मुले असून जावेदचा प्रेमविवाह झाला होता. पणजीत तो कॅसिनोमध्ये कामाला जायचा, अशी माहिती उपलब्ध झाली.
मृतदेहाबाबत संभ्रम...
काल (शुक्रवारी) सकाळी कांपाल येथे नदीत मृतदेह तरंगत असल्याची माहिती मिळताच पणजी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता, तसेच सडेकर याच्या वर्णनाशी जुळणारा नव्हता. त्यामुळे या अनोळखी मृतदेहाची माहिती बिनतारी संदेशद्वारे सर्व पोलिस स्थानकांना देण्यात आली होती.
पर्वरी पोलिस स्थानकात तीन दिवसांपूर्वी मालिम जेटीवर काम करणारा मूळचा झारखंड येथील मजूर सुरजीत सहाय बेपत्ता असल्याची तक्रार देण्यात आली होती. त्या मजुराच्या अंगावरील कपड्याची माहिती सापडलेल्या मृतदेहावरील कपड्यांशी मिळतीजुळती असल्याने त्याची ओळख पटली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.