Goa Congress: ...म्हणूनच राज्‍यात गुन्‍हेगार, माफियांना रान मोकळे- काँग्रेसचा हल्लाबोल

अमित पाटकर : दूषित पाणीपुरवठा प्रकरणी आमदार वाझ यांना ‘मौलिक’ सल्ला
Goa Congress
Goa CongressDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Congress सांडपाणी वाहून नेणाऱ्या पाण्याच्या टँकरला कोणतीही वैध परवानगी नसल्याचा खुलासा कुठ्ठाळाचे आमदार आंतोन वाझ यांनी केल्याने भाजप सरकार कोलमडल्याचे तसेच गुन्हेगार व माफियांना पूर्णपणे मोकळे रान मिळाल्‍याचे पुन्‍हा एकदा स्पष्ट झाले आहे.

त्‍यामुळे या अकार्यक्षम व भ्रष्ट भाजप सरकारला दिलेल्या समर्थनाचा कुठ्ठाळीच्या आमदाराने पुनर्विचार करावा तसेच आत्मपरीक्षण करावे, असा सल्ला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी दिला आहे.

आमदार आंतोन वाझ यांनी बोलाविलेल्या बैठकीचा एक व्हिडिओ जारी करून पाटकर यांनी आरोप केला की, सांकवाळ येथील नागरिकांच्या सतर्कतेने सांडपाणी वाहून नेणारा पाण्याचा टँकर पकडल्यानंतर पाच दिवस उलटूनही सरकारचे आरोग्य, जलस्त्रोत, वाहतूक आणि पोलिस खाते निद्रिस्‍त आहे. या खात्‍याच्‍या अधिकाऱ्यांनी कोणतीही कारवाई केलेली नाही.

Goa Congress
CM Pramod Sawant: सरकारी गृहकर्ज योजना पुढील वर्षापासून होणार पूर्ववत

सरकारचा प्रत्येक विभाग व खाते दुसऱ्यांकडे बोट दाखवत असल्याचे व्हिडिओद्वारे स्पष्ट होत आहे. त्यांनी अजूनही सदर टॅंकरातील पाण्‍याचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठविलेले नाहीत.

सदर टँकरची नोंदणी रद्द करण्यापासून आणि चालक परवाना कायमस्वरूपी निलंबित करण्यापासून वाहतूक अधिकाऱ्यांना कोणी रोखले आहे का? असा सवाल पाटकर यांनी उपस्‍थित केला.

हवा, पाणी आणि अन्न या जीवनाच्या मूलभूत गरजा आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार जनतेला शुद्ध आणि आरोग्यदायी पिण्याचे पाणी देण्यास अपयशी ठरले आहे.

या कडक उन्हाळ्यात महिलांना पाण्याचे एक भांडे भरण्यासाठीही संघर्ष करावा लागत आहे. त्‍यामुळे भाजप सरकारला सत्तेत राहण्याचा मुळीच अधिकार नाही, असे पाटकर म्हणाले.

Goa Congress
37th National Games in Goa: 37 व्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी गोवा सज्ज, गोव्याच्या तयारीवर ‘ऑलिम्पिक’ संघटना समाधानी

सांडपाणी टँकरमाफियांना सरकारकडून प्रोत्साहन

सर्व अपक्ष आमदारांनी तसेच भ्रष्ट भाजप सरकारला पाठिंबा देणाऱ्या इतर बिगरभाजप आमदारांनी ‘आरोग्य हीच संपत्ती’ हे लक्षात घेतले पाहिजे. लोकांच्या आरोग्याची काळजी घेणे हे सरकारचे कर्तव्य आहे हे जाणले पाहिजे.

भाजप सरकार लोकांच्या जीवाशी खेळून सांडपाणी टँकरमाफियांना प्रोत्साहन देत आहे. अपक्ष व बिगरभाजप आमदारांनी आताच शहाणे व्हावे व भाजपच्या पापाचे वाटेकरू होऊ नये, असे सल्लाही पाटकर यांनी दिला आहे.

Goa Congress
Goa Petrol-Diesel Price: गोव्यातील इंधनाच्या दरात घट; वाचा आजचे पेट्रोल-डिझेलचे दर

काँग्रेस पक्ष सरकारवर दबाव कायम ठेवणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि एफडीएला बेकायदा टॅंकरमाफीयांबद्गल जाब विचारून कृती करण्यास लावल्यानंतर आम्ही लवकरच जलस्रोत आणि आरोग्य विभागाकडे मोर्चा वळविणार आहोत.

भाजप सरकारने प्रोत्साहन दिलेल्या सांडपाणी आणि टँकरमाफियांवर कारवाई करण्यास त्‍यांना भाग पाडू. - अमित पाटकर, काँग्रेस प्रदेशाध्‍यक्ष

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com