Child Writer: 'गौरवी, असेच आणखी लिहीत जा'; 10 वर्षांच्या बाललेखिकेच्या 29 निबंधांना मुख्यमंत्र्यांची दाद, पहिल्या पुस्तकाचे प्रकाशन

Konkani Essay Book Launch: गौरवीने सुरुवातीला आपले लेखन वहीत लिहिले आणि त्यानंतर स्वतःच्या लॅपटॉपवर देवनागरी लिपीत टंकलेखन करून ते पुस्तकाच्या स्वरूपात आणले.
Konkani Essay Book Launch
Child WriterDainik Gomantak
Published on
Updated on

वाळपई: विवेकानंद विद्या मंदिर कोंकणी प्राथमिक विद्यालय, केरी-सत्तरी येथे चौथी इयत्तेत शिकणाऱ्या दहा वर्षीय गौरवी गोपिनाथ गावस हिच्या पहिल्या कोंकणी निबंधसंग्रहाचे प्रकाशन गणेश चतुर्थीच्या दिवशी कोठंबी-पाळी येथे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि पद्मिनी फाउंडेशनच्या अध्यक्षा सुलक्षणा सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.

‘म्हजीं शब्द फुलां’ या निबंधसंग्रहाच्या प्रकाशनावेळी साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक डॉ. प्रकाश पर्येंकर, गणपत पार्सेकर बी.एड. महाविद्यालयाचे प्राध्यापक खुशाली प्रभू, साहित्य मंथन सत्तरीचे अध्यक्ष गोपिनाथ गावस तसेच पुस्तकाचे मुखपृष्ठ तयार करणारे जयराम परब उपस्थित होते.

Konkani Essay Book Launch
Goa Crime: लग्नाचे आमिष दाखवून बलात्काराचा आरोप; 90 लाखांचे दागिने-रोकड घेतल्याप्रकरणी खटला सत्र न्यायालयाकडे वर्ग

विशेष म्हणजे, गौरवीने सुरुवातीला आपले लेखन वहीत लिहिले आणि त्यानंतर स्वतःच्या लॅपटॉपवर देवनागरी लिपीत टंकलेखन करून ते पुस्तकाच्या स्वरूपात आणले. तिच्या या लेखनप्रवासात तिचे वडील गोपिनाथ विष्णू गावस आणि आई गायत्री गोपिनाथ गावस यांचे मोलाचे सहकार्य लाभले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गौरवीचे कौतुक करून, “गौरवी, असेच आणखी लिहीत जा,” असे म्हणत तिच्या पुढील साहित्यिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

गौरवीच्या लेखनाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, डॉ. प्रकाश पर्येंकर, डॉ. हेमंत अय्या, काशिनाथ नाईक, प्रा. खुशाली प्रभू, संदेश केसरकर, रामदास शेटकर, जयराम परब, विनायक सुतार, सरोजिनी गावकर, सुरेखा पाटील, प्रियांका उसपकर, नमन सावंत, सारिका नाईक, संजय सालेलकर, जानकी परब, महादेव गावकर, समीक्षा शिरोडकर, लाडको कुडतकर, अस्मिता पांगम तसेच तिची शिक्षिका नूतन मलिक यांच्यासह अनेकांचे प्रोत्साहन मिळाले.

गौरवीच्या निबंधसंग्रहाला पीएमश्री सरकारी माध्यमिक विद्यालय, ठाणे-सत्तरीचे मुख्याध्यापक काशिनाथ नाईक यांनी प्रस्तावना लिहिली असून, साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक डॉ. प्रकाश पर्येंकर यांनी पुस्तकासाठी ‘ब्लर्ब’ लिहिला आहे. तिचे वडील गोपिनाथ गावस यांनी तिच्या लेखनप्रवासाबाबत लेखन केले आहे.

Konkani Essay Book Launch
Goa Politics: 'गोवा फर्स्ट'चा नारा पुन्हा बुलंद! धर्मनिरपेक्ष आघाडीसाठी समविचारी पक्षांना एकत्र आणणार; गोवा फॉरवर्डची भूमिका स्पष्ट

लहान वयातच लेखनाची सुरुवात

गौरवी हिने लहान वयातच आपल्या लेखनाची सुरुवात केली. तिसरी इयत्तेत शिकत असताना ती सुरुवातीला पाच-दहा ओळींचे छोटे निबंध लिहायची. आता चौथीत शिकत असताना तिने विविध विषयांवर लेखन करत २९ निबंधांचा संग्रह तयार केला आहे. गावातील सण-उत्सव, शाळेतील अनुभव, घरातील व्यक्ती, परिसरातील भ्रमंती तसेच दैनंदिन जीवनातील अनुभव तिने आपल्या बालसुलभ भाषेत मांडले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com