Goa Politics: महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षांनी घेतली गोव्याचे मुख्यमंत्री आणि मंत्र्यांची भेट; काय झाली चर्चा?

Goa Maharashtra Politics: गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी शासन, विकास आणि सहकार्य अशा विविध मुद्यांवर चर्चा झाल्याचे नार्वेकर म्हणाले.
Speaker of Maharashtra Legislative Assembly Meet Goa CM Pramod Sawant
Rahul Narvekar Meet Goa CMDainik Gomantak
Published on
Updated on

पर्वरी: महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतली. पर्वरीतील मंत्रालयात नार्वेकरांनी शुक्रवारी (१४ फेब्रुवारी) मुख्यमंत्री सावंत यांची भेट घेतली. मुख्यमंत्री सावंत यांच्याशी शासन, विकास आणि सहकार्य अशा विविध मुद्यांवर चर्चा झाली, अशी माहिती नार्वेकरांनी त्यांच्या एक्सवरील पोस्टमधून दिली आहे.

राहुल नार्वेकरांनी मुख्यमंत्री सावंत यांच्यासोबतच्या भेटीचे फोटो सोशल मिडियावर प्रसिद्ध केले आहेत. "अशा प्रकारच्या संवादांमधून विकासाच्या सार्वजनिक दृष्टीकोनाला बळकटी मिळते. लोक कल्याणासाठी महाराष्ट्र आणि गोवा यांच्यातील संबंध दृढ होतात. अशाच सहकार्याची अपेक्षा आहे", असे नार्वेकरांनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

Speaker of Maharashtra Legislative Assembly Meet Goa CM Pramod Sawant
Vikat Bhagat: चांगल्या घरात जन्म, मौजमजेपायी चोऱ्या, शेवटी परदेशी तरुणीची बलात्कार, हत्या; गोव्यातला नराधम विकट भगत कोण आहे?

तसेच, राहुल नार्वेकरांनी गोव्याचे आरोग्य, नगरनियोजन आणि वन मंत्री विश्वजीत राणे यांची देखील भेट घेतली. राणे यांच्याशी यावेळी विविध मुद्यांवर चर्चा झाली. "यात प्रमुख धोरणात्मक क्षेत्रे, शासन धोरणं, प्रगती आणि विकास असे विषय चर्चेच्या केंद्रस्थानी होते. संवादातून नागरिकांच्या भल्यासाठी काम करण्याची अपेक्षा व्यक्त केली", असे नार्वेकरांनी म्हटले आहे.

Speaker of Maharashtra Legislative Assembly Meet Goa CM Pramod Sawant
Old Mandovi Bridge Closed: वाहनचालकांची डोकेदुखी वाढली; जुना मांडवी पूल 15 दिवस बंद, पर्यायी मार्ग काय?

गोव्याचे पर्यटन, आयटी आणि प्रिंटिंग खात्याचे मंत्री रोहन खंवटे यांची देखील राहुल नार्वेकरांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी पर्यटन आणि संबधित क्षेत्राशी निगडित विविध विषयावर चर्चा केल्याची माहिती खंवटे यांनी दिली आहे.

Speaker of Maharashtra Legislative Assembly Meet Goa CM Pramod Sawant
Goa Education: शालेय पुस्तके वेळेवर उपलब्ध होणार! संचालकांनी दिली खात्री; जुनी की नवीन यावरून पालक, विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम

मंत्री रोहन खंवटे यांच्याशी पर्यटन आणि तंत्रज्ञानाच्या विकसित होत असलेल्या नव्या तंत्रज्ञावर चर्चा झाली. तसेच, पर्यटनातली नाविन्यपूर्ण संधी, शाश्वत विकास आणि दोन राज्यांमधील सहकार्य यावर प्रकाश टाकण्यात आला. अशा संवादांमुळे धोरणे आणि सुशासन बळकट होण्यास मदत होते, असे राहुल नार्वेकरांनी पोस्टमधून म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com