South Goa District Hospital: दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात औषधटंचाईचे ग्रहण कायम; आता 'डी-25' ड्रिप्‍स उपलब्‍ध नसल्‍यानं रुग्‍णांचं हाल

District Hospital Issues: पुरेसा औषधसाठा उपलब्ध नसल्‍याने वारंवार चर्चेत असलेले हॉस्‍पिसियो म्‍हणजेच दक्षिण गोवा जिल्‍हा इस्‍पितळ पुन्‍हा डी-२५ म्‍हणजेच २५ टक्‍के डेक्‍सट्रोज असलेले ड्रिप्‍स नसल्‍याने चर्चेत आले आहे.
medicine shortage in Goa hospital
medicine shortage in Goa hospitalDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: पुरेसा औषधसाठा उपलब्ध नसल्‍याने वारंवार चर्चेत असलेले हॉस्‍पिसियो म्‍हणजेच दक्षिण गोवा जिल्‍हा इस्‍पितळ पुन्‍हा डी-२५ म्‍हणजेच २५ टक्‍के डेक्‍सट्रोज असलेले ड्रिप्‍स नसल्‍याने चर्चेत आले आहे. खुल्‍या बाजारात अशा ड्रिप्‍ससाठी फारसे ग्राहक उपलब्‍ध नसल्‍याने ते ठेवले जात नाहीत. त्‍यामुळे खुल्‍या बाजारातही ते उपलब्‍ध नसल्‍याने रुग्‍णांच्‍या नातेवाईकांचे हाल होत आहेत. अधिक चौकशी केली असता, मागील दोन महिन्‍यांपासून इस्‍पितळातील स्‍थिती अशीच असून सध्‍या काही औषधे खुल्‍या बाजारातून विकत घेऊन वेळ मारून नेली जात असल्‍याची माहिती प्राप्‍त झाली आहे.

medicine shortage in Goa hospital
Health Tips: चहा-कॉफी पिणं कायमचं सोडलं तर काय होईल? 'हे' ८ आश्चर्यकारक बदल पाहायला मिळतील

यासंदर्भात हॉस्‍पिसियोचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र बोरकर यांना विचारले असता, इस्पितळात काही प्रमाणात औषधांचा तुटवडा आहे, ही गोष्‍ट त्‍यांनी मान्‍य केली. मात्र, सलाईनसारख्‍या आवश्‍‍यक बाबी उपलब्‍ध असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. ठरावीक औषधे उपलब्‍ध नसल्‍याने रुग्‍णांच्‍या नातेवाईकांना ती बाहेरून विकत आणावी लागतात, ही गोष्‍टही त्‍यांनी मान्‍य केली.

अधिक चौकशी केली असता या इस्‍पितळात शस्‍त्रक्रिया आणि इतर कामांसाठी वापरल्या जाणाऱ्या हातमोज्‍यांचीही वानवा असून दैनंदिन उपचारांवर त्‍याचे विपरित परिणाम झाल्‍याची माहिती प्राप्‍त झाली. याहीसंदर्भात डॉ. बोरकर यांना विचारले असता, हातमोजे कमी असल्‍याची गोष्‍ट त्‍यांनी मान्‍य केली. मात्र, लवकरच नवीन साठा विकत घेण्‍याची प्रक्रिया सुरू असल्‍याची माहिती त्‍यांनी दिली.

medicine shortage in Goa hospital
Health Issue: कोल ड्रिंक पिणं कायमचं सोडलं तर काय होईल? 'हे' ८ आश्चर्यकारक बदल पाहायला मिळतील

कशासाठी उपयोगी आहे ‘डी-२५ ड्रिप्‍स’?

‘डी-२५ ड्रिप्‍स’ हे ज्‍या रुग्‍णांचे शरीरातील साखरेचे प्रमाण कमी आहे, अशा रुग्‍णांना ते देण्‍यात येते. या ड्रिप्‍समुळे शस्‍त्रक्रिया केलेले जे रुग्‍ण काही अन्‍य खाऊ शकत नाहीत, त्‍यांच्‍या शरीरात तात्‍पुरत्‍या प्रमाणात कार्बोहायड्रेट कॅलरीज तयार करतात. मात्र, हे ड्रिप्‍स सर्व रुग्‍णांना वापरले जात नाहीत. त्‍यामुळे खुल्‍या बाजारात ते विक्रीला सहसा उपलब्‍ध नसतात.

लवकरच निविदा जारी करणार : डॉ. बोरकर

हॉस्‍पिसियोत हे ड्रिप्‍स उपलब्‍ध नसल्‍याचे रुग्‍णांच्‍या नातेवाईकांनी ‘गोमन्‍तक’च्‍या नजरेस आणून दिल्‍यानंतर चौकशी केली असता, मागील दोन महिन्‍यांपासून असे प्रकार सुरू असल्‍याची बाब नजरेस आली. डॉ. बोरकर यांना विचारले असता, ठरावीक औषधे हॉस्‍पिसियोत उपलब्‍ध नाहीत. मात्र, ती मिळविण्‍यासाठी निविदा जारी केली जाईल, अशी माहिती त्‍यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Congress Kushavati district
 Anmod Forest Murder Case
Goa Lifeguards Rescue 28 Fishermen
South Goa Mining Dump Auction
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com