दैनिक गोमन्तक डिजिटल
चहा-कॉफीमधील कॅफिनमुळे झोपेत येणारे अडथळे दूर होतात. कॅफिन सोडल्यामुळे शरीर पूर्णपणे रिलॅक्स होते आणि शांत, गाढ झोप लागण्यास मदत होते.
चहा आणि कॉफीमध्ये असलेल्या 'टॅनिन्स'मुळे दातांवर पिवळे डाग पडतात. हे पेये बंद केल्याने दातांचा नैसर्गिक पांढरेपणा परत येतो आणि इनॅमल सुरक्षित राहते.
कॅफिनमुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन त्वचा कोरडी पडते. चहा-कॉफी सोडल्याने शरीर हायड्रेट राहते आणि त्वचा डिटॉक्स होऊन चेहऱ्यावर चमक येते.
कॅफिनमुळे हृदयाचे ठोके आणि रक्तदाब अचानक वाढतो. चहा-कॉफी पिणे बंद केल्यास रक्तवाहिन्यांवरील ताण कमी होतो आणि रक्तदाब सामान्य राहण्यास मदत होते.
रिकाम्या पोटी किंवा जास्त चहा-कॉफी पिल्याने पोटात अॅसिड तयार होते. हे सोडल्यामुळे अपचन, छातीत जळजळ आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कायमचा दूर होतो.
कॅफिनमुळे शरीरात 'स्ट्रेस हार्मोन्स' वाढतात, ज्यामुळे चिडचिड आणि अस्वस्थता होते. चहा-कॉफी सोडल्याने मन शांत होते आणि मूड स्विंग्स नियंत्रणात येतात.
चहा-कॉफीमधील घटक शरीराला लोह (Iron) आणि कॅल्शियम शोषून घेण्यास अडथळा ठरतात. ते बंद केल्याने अन्नातील सर्व पोषक तत्वे शरीराला योग्य प्रकारे मिळतात.
चहा-कॉफी पिल्याने तात्पुरती ऊर्जा मिळते आणि नंतर लगेच थकवा जाणवतो. कॅफिन सोडल्याने शरीराची ऊर्जा पातळी दिवसभर नैसर्गिकरित्या स्थिर राहते.
गोव्यातील जादुई बीच घालतो साद