

सासष्टी: सासष्टीतील सर्व मतदारसंघांमध्ये काँग्रेसला चांगला प्रतिसाद मिळत आहे. काही स्थानिक प्रश्न असले तरी सर्वजण एकजुटीने निवडणूक लढवण्यास तयार आहेत. पक्षात कुणालाही मागील दरवाजाने प्रवेश दिलेला नाही. उमेदवारी देताना पूर्ण तपासणी, निष्ठा, स्थानिक काम व कार्यकर्त्यांशी असणारे संबंध या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करण्यात आला आहे, असे काँग्रेसचे दक्षिण गोवा (South Goa) जिल्हाध्यक्ष सावियो डिसिल्वा यांनी स्पष्ट केले.
जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी मंगळवारी अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिवशी सासष्टी तालुक्यातील सर्व मतदारसंघांमध्ये मोठी राजकीय लगबग पाहायला मिळाली. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सकाळपासूनच उमेदवार व कार्यकर्त्यांची गर्दी निर्वाचन कार्यालयाबाहेर दिसत होती. नुवे, कोलवा, बाणावली, दवर्ली आणि नावेली या पाचही मतदारसंघांतील उमेदवारांनी अर्ज सादर केले.
अर्ज सादर करणाऱ्यांमध्ये अँथनी ब्रागांझा (नुवे), वेनिसिया कार्व्हालो (कोलवा), लुईझा परेरा ई रॉड्रिगीस (बाणावली), फ्लोरियानो फर्नांडिस (दवर्ली) आणि मेलिफा कार्दोझ (नावेली) यांचा समावेश आहे. उमेदवारांसोबत त्यांच्या समर्थकांनी घोषणाबाजी करत वातावरणात उत्साह निर्माण केला.
काँग्रेसचे सर्व उमेदवार गेल्या काही दिवसांपासून घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत. एका उमेदवाराने सांगितले की, मतदार घरोघरी भेटल्यावर सर्वसामान्यांच्या अनेक समस्या समोर येतात. पाणी, वीज, रस्ते, नितळ प्रशासन, कचरा व्यवस्थापन आदी प्रश्नांची दखल घेऊन त्यांचे निराकरण करण्याला आम्ही प्राधान्य देणार आहोत. गावाच्या एकूण विकासाचे ध्येय ठेवूनच आम्ही प्रचार करत आहोत. दरम्यान, सासष्टी तालुक्यात या निवडणुकीत काही ठिकाणी तिरंगी तर काही ठिकाणी थेट लढती होण्याची चिन्हे आहेत.
निष्ठा व पक्षाशी सातत्यपूर्ण संबंध
स्थानिक पातळीवरील कामगिरी
कार्यकर्त्यांशी चांगले संबंध
महिला व युवा नेतृत्वाला प्राधान्य
स्वच्छ, पारदर्शी प्रशासनावर भर
रस्ते व मूलभूत सुविधा
पाणीपुरवठ्याची टंचाई
कचरा व्यवस्थापन
स्थानिक प्रशासनातील विलंब
ग्रामविकासाच्या गरजा
यावेळच्या जिल्हा पंचायत निवडणुकीत काँग्रेस (Congress) पक्षाने युवा, महिलांना प्राधान्य देण्याबरोबरच स्वच्छ प्रशासनावर विशेष भर दिला आहे. सक्षम आणि कार्यक्षम नेतृत्वाला प्राधान्य देण्याचा आमचा उद्देश आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.