South Goa Planning and Development Authority: किरकोळ मासळी मार्केटचे लवकरच नूतनीकरण; चेअरमन साळकर यांनी दिली माहिती

South Goa Planning and Development Authority: राज्य सरकारला प्रस्ताव पाठविण्याचा निर्णय, सोपोबाबत निविदा अधिवेशनापूर्वी ठरणार
South Goa Planning and Development Authority
South Goa Planning and Development AuthorityDainik Gomantak

South Goa Planning and Development Authority: ‘एसजीपीडीए’ किरकोळ मासळी मार्केटचे नूतनीकरण लवकरच केले जाईल. त्यासाठी राज्य सरकारला प्रस्ताव पाठविण्याचा निर्णय आज झालेल्या एसजीपीडीए मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. नूतनीकरण झाल्यावर मासळी मार्केट विक्रेत्याकडे चर्चा करून सोपो शुल्क रक्कम ठरविण्यात येईल, असा निर्णय यावेळी घेण्‍यात आला, अशी माहिती एसजीपीडीएचे चेअरमन दाजी साळकर यांनी दिली.

घाऊक मासळी मार्केटमध्ये अवजड वाहनांसाठी ५०० रुपये शुक्ल आकारले जाते. पण आता काही विक्रेते आठ, दहा व सोळा चाकांचे सुद्धा मोठे ट्रक आणतात, अशा अवजड वाहनांसाठी ८०० ते १००० रुपये शुल्क आकारणी करण्याचा निर्णय घेतल्याचे साळकर यांनी सांगितले. आमदार दिगंबर कामत, आमदार विजय सरदेसाई उपस्थित होते.

घाऊक मासळी मार्केटमध्ये सोपो शुल्क गोळा करण्यासाठी नव्याने निविदा आगामी विधानसभा अधिवेशनापूर्वी  जाहीर केल्या जातील. एसजीपीडीएच्या मैदानावर पार्किंगसाठी जागा उपलब्ध करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला, अशी माहिती साळकर यांनी दिली.

South Goa Planning and Development Authority
Fish Market: मत्स्य व्यवसाय समुद्रापुरता मर्यादित नाही

अटी शिथिल करा!

आमदार विजय सरदेसाई म्हणाले, सोपो शुल्कातून एसजीपीडीएला कंत्राटदारांकडून नेमकी किती महसूल अपेक्षित आहे, हे सर्वप्रथम ठरविले पाहिजे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या म्हणण्यानुसार महिन्याला ५० लाख व वर्षाला सहा कोटी येणे आवश्यक आहे. मात्र हे वस्तुस्थितीत बसत नाही. त्याचबरोबर निविदेतील अटी शिथिल केल्या पाहिजे. एसजीपीडीए मैदानावरील ‘पे पार्किंग’साठी शुल्क लोकांना परवडेल, असेच ठेवावे. २८ किंवा २९ जून रोजी परत एकदा बैठक होईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com