G-20 अजेंड्याच्या अनुषंगाने पणजी आकाशवाणी केंद्रात चर्चासत्र; संशोधन, कौशल्य विकासावर चर्चा

गोव्याच्या कौशल्य विकासातील उणीवा दूर करण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.
Akashvani Panaji Goa: G20 Agenda
Akashvani Panaji Goa: G20 AgendaPIB

आकाशवाणी पणजी केंद्राच्या वतीने गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री आणि एस. एस. डेम्पो कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स यांच्या संयुक्त विद्यमाने आज (दि.28) एक दिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. G-20 अजेंड्याच्या अनुषंगाने सर्वसमावेशक विकासाला चालना देणे आणि गोव्याच्या कौशल्य विकासातील उणीवा दूर करण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.

जी-20 चे नोडल अधिकारी आयएएस संजीत रॉड्रिग्ज, गोवा विद्यापीठाचे कुलगुरु हरिलाल मेनन, गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपे, आकाशवाणीचे उपमहासंचालक सुनील भाटिया आणि कार्यक्रम अधिकारी संजय पुनाळेकर यावेळी उपस्थित होते.

यावेळी संजित रॉड्रिग्ज यांनी गोव्यात जी-20 परिषदेच्या आयोजनातून आलेले अनुभव मांडले. त्यांनी विद्यार्थ्यांना 'गोवा घोषणापत्रा'च्या तपशिलात जाऊन अभ्यास करण्याचे आवाहन केले. जी-20 पर्यटन बैठकीतून साध्य झालेल्या या डिक्लेरेशन मध्ये भविष्यातील पर्यटन विकासाची वाटचाल आणि शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्याच्या क्षमतेची रूपरेषा देण्यात आली आहे.

Akashvani Panaji Goa: G20 Agenda
केनियाचे संरक्षण मंत्री पहिल्या भारत दौऱ्यावर; गोवा आणि बेंगळुरू मधील संरक्षण उद्योगांना देणार भेट

गोवा विद्यापीठाचे कुलगुरू हरिलाल मेनन यांनी 2010 पासून आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक्स आणि इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी) इनोव्हेशनमुळे रोजगार क्षेत्रात आगामी काळात बदल होण्याची शक्यता वर्तवली. विद्यार्थ्यांनी संशोधनाला प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

श्रीनिवास धेंपे यांनी विद्यार्थ्यांचे भवितव्य घडविण्यासाठी अशा चर्चासत्रांचे महत्त्व अधोरेखित केले. नवे शैक्षणिक धोरण (NEP) आणि विद्यार्थ्यांना आगामी नोकरीच्या संधींसाठी तयार करण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.

यावेळी उत्पादन क्षेत्र (मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री), आरोग्य (हेल्थ अँड वेलनेस), पर्यटन क्षेत्र (टुरिझम अँड हॉस्पिटॅलिटी) आणि विमानतळ, बंदरे आणि पायाभूत सुविधा (एअरपोर्ट, पोर्ट अँड लॉजिस्टिक्स)' या विषयांवर माहितीपर सत्रांचे आयोजन करण्यात आले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com