केनियाचे संरक्षण मंत्री पहिल्या भारत दौऱ्यावर; गोवा आणि बेंगळुरू मधील संरक्षण उद्योगांना देणार भेट

भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याशी ते 29 ऑगस्ट रोजी चर्चा करतील.
Kenyan Cabinet Secretary for Defence on India Visit
Kenyan Cabinet Secretary for Defence on India Visit

Kenyan Cabinet Secretary for Defence on India Visit: केनियाचे  संरक्षण मंत्री  एडन बेरे दुआले तीन दिवसीय भारत भेटीवर आले आहेत. दुआले सोमवारी (दि.28) दिल्लीत दाखल झाले. भारताचे संरक्षण मंत्री  राजनाथ सिंह यांच्याशी ते 29 ऑगस्ट रोजी चर्चा करतील.

केनियाचे संरक्षण मंत्री एडन बेरे दुआले यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. भारत भेटी दरम्यान दुआले भारतातील शिपयार्ड आणि गोवा आणि बेंगळुरू येथील संरक्षण उद्योगांना भेट देणार आहेत.

केनियात सप्टेंबर 2022 मध्ये केनियामध्ये नवीन सरकार स्थापन झाल्यानंतरची  तेथील वरिष्ठ पातळीवरील मंत्र्याची ही पहिलीच राजकीय भेट आहे. दुआले यांची ही भेट म्हणजे भारत, आफ्रिकी राष्ट्रांसोबतच्या संबंधांना देत असलेले महत्व आणि भारत आणि केनिया यांच्यातील वाढत्या सहकार्याचे प्रतीक आहे.

या माध्यमातून उभय देशांमधील संरक्षण सहकार्य अधिक बळकट करण्यासाठी ही भेट महत्वाची मानली जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com