In Goa, vegetables became more expensive again

In Goa, vegetables became more expensive again

Dainik Gomantak

Goa: गोव्यात भाजीपाला पुन्हा महागला!

गोव्यात भाजीपाल्याच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना आता भाजीपाला विकत घ्यायचा की नाही, असा सवाल पडला आहे.

Goa: मागील 2 वर्षे संगळ्यांसाठीच अत्यंत त्रासदायक होती. आधीच महामारीने सर्वजण हैराण झाले होते त्यानंतर महागाईने सामान्य जनता होरपळून गेली. त्यात विशेषत: भाजीपाल्याचे (Vegetables) दर दिवसेंदिवस गगनाला भिडत आहेत. त्यामुळे सामान्य महिलाना घरचे बजेट सांभाळताना तारेवरची कसरत होत आहे.

<div class="paragraphs"><p>In Goa, vegetables became more expensive again</p></div>
गोव्यात INS Hansa वर बोइंग P-8I एयरक्राफ्ट कार्यरत

मध्यंतरी गोव्यातील भाजीपाला आणि मासळीचे दर वाढले असताना आता पुन्हा ह्या भाज्यांच्या दरांमध्ये वाढ (Vegetable Price) झाली आहे. आधीच दररोजचे जीवन जगताना सामान्यांची होत असलेली तारांबळ आणि त्यात भाजीपाला यासारख्या दैनंदिन जीवनासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टींची वाढती महागाई यामुळे नागरिक पूर्णपणे पिचून गेले आहेत.

<div class="paragraphs"><p>In Goa, vegetables became more expensive again</p></div>
‘तृणमूल’ गोळा करते महिलांची खासगी माहिती

गोव्यामध्ये भाजीपाला बेळगाव आणि कोल्हापूरमधून येत असतो. सध्या भाजीपाल्यात तब्बल 40 ते 120 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. त्यामुळे ज्या लोकांची आर्थिक परिस्थिति बिकट आहे, किंवा रोजगारावर काम करणाऱ्यांमध्ये आता भाजीपाला विकत घ्यायचा का नाही, असा सवाल लोकांना उपस्थित आहे. जमेची बाब अशी की, कांदे, बटाटे आणि टोमॅटो यांचे दर मात्र स्थिर आहेत; पण बाकीच्या भाजीपाल्याचे दर अक्षरश: गगनाला भिडले आहेत. त्यामुळे सामान्यांना फजत कांदे, बटाटे आणि टोमॅटोच खरेदी करावे लागत आहे. या सर्व परिस्थितीमध्ये सरकारने मात्र संपूर्णपणे कानाडोळा केला आहे. या सर्व गोष्टींमध्ये गोवा सरकारने लक्ष घालून सामान्य नागरिकांना मदत करावी, असा सूर नगरिकांमधून उमटत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com