Goa Agriculture: सत्तरीत सुपारीच्या तोडणीला जोर; कुशल कामगारांची धावपळ, दरवाढीची मागणी

Areca Nut Farming: सत्तरी तालुक्यातील बागायतदारांच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत असलेल्या सुपारीच्या ओल्या फळांच्या पहिल्या तोडणीला जोर आला आहे.
Areca Nut Farming
Goa AgricultureDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

वाळपई: सत्तरी तालुक्यातील बागायतदारांच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत असलेल्या सुपारीच्या ओल्या फळांच्या पहिल्या तोडणीला जोर आला आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत चालणाऱ्या या हंगामामुळे बागायतदार सध्या काढणीच्या कामात व्यस्त आहेत. सुपारीच्या झाडांवर चढून फळांचे घड काढण्यासाठी कुशल कामगारांची मदत घेतली जात आहे.

सुपारीला चांगला दर मिळत असल्याने गेल्या काही वर्षांत बागायतदारांचा या पिकाकडे कल वाढला आहे. लागवडीनंतर साधारण पाच ते सहा वर्षांनी झाडांना फळे येण्यास सुरुवात होते. हंगामात गरजेनुसार तीन ते चार वेळा काढणी केली जाते. पूर्ण पक्व झालेली पिवळसर किंवा नारंगी रंगाची फळे तोडली जातात. पावसाळ्यात जमिनीवर पडलेली परिपक्व फळेही गोळा करून वाळवून ठेवली जातात.

Areca Nut Farming
Goa Freedom Fighter: 10 वर्षांचा एकांतवास, मृत्यूची खोटी बातमी अन् मायभूमीची ओढ; गोव्याचे लोहपुरुष नारायण हरी नाईक यांची संघर्षगाथा

सुपारीची झाडे २० ते ३० फूट किंवा त्याहून अधिक उंच असल्याने काढणीचे काम कष्टाचे असते. पारंपरिक पद्धतीत कुशल कामगार झाडावर चढून विळ्याच्या साहाय्याने घड कापतात. काही ठिकाणी लांब दांड्याला विळा जोडलेल्या उपकरणांचाही वापर केला जातो. काढणीनंतर घडांमधून फळे वेगळी करून ती उन्हात वाळवली जातात. पांढरी सुपारी तयार करण्यासाठी पूर्ण पक्व फळे साधारण ४० ते ४५ दिवस वाळवावी लागतात.

दरात घसरण; बागायतदार चिंतेत

गोवा बागायतदार सहकारी खरेदी-विक्री सोसायटीच्या वाळपई शाखेत गतवर्षी वाळवून ठेवलेली सुपारी सोलून विक्रीसाठी आणली जात आहे. यंदा मार्चमध्ये प्रतिकिलो ४४५ रुपये असलेला दर घसरून सध्या ३९० रुपयांपर्यंत आला आहे. त्यामुळे सुपारीचा दर पुन्हा चारशे रुपयांच्या पुढे जावा, अशी मागणी बागायतदार करत आहेत.

Areca Nut Farming
Goa Agriculture News: डिचोलीत भातकापणीला वेग; अवकाळी पावसामुळे यंदा उत्पादनात 50 टक्के घट होण्याची शक्यता

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com