

पणजी: राज्यातील बहुचर्चित जमीन हडपप्रकरणी अटकेत असलेल्या सिद्दीकी सुलेमान खान याला मेरशी येथील सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे.
वाळपई पोलिस ठाण्यात २०२१ मध्ये दाखल झालेल्या तक्रारीनुसार, राफेल लुईस जोस लोबो यांच्या तिसवाडी-गवळीमौळा येथील वडिलोपार्जित मालमत्तेचे बनावट विक्रीखत (सेल डीड) तयार केल्याचा आरोप खान याच्यावर आहे. त्याला २५ नोव्हेंबर २०२४ रोजी अटक केली होती.
सुलेमानचा या प्रकरणात हा दुसरा जामीन अर्ज होता. यापूर्वी १६ जानेवारी २०२६ रोजी त्याचा जामीन अर्ज फेटाळला होता. मात्र, शुक्रवारी दिलेल्या आदेशात न्यायालयाने नमूद केले की, पूर्वी उपलब्ध नसलेला ''सीएफएसएल''चा हस्ताक्षराचा अहवाल आता प्राप्त झाला आहे. न्यायालयाने आदेशात म्हटले की, अहवालावरून हे स्पष्ट होते की, ज्या तीन विक्रीखतांमध्ये फेरफार केला आहे, तो सुलेमाननेच केला आहे, असे ठोसपणे म्हणता येत नाही.
या प्रकरणात १९७७ आणि १९९९ सालातील बनावट विक्रीखते तयार करून ती वाळपई उपनिबंधक कार्यालयातील रेकॉर्डमध्ये घुसविल्याचा पोलिसांचा आरोप आहे. या प्रकरणात दुसऱ्या आरोपीविरुद्ध पुराव्याअभावी अद्याप आरोपपत्र दाखल केलेले नाही. मी या जमिनीचा प्रामाणिक खरेदीदार असून राजकीय दबावापोटी मला या प्रकरणात अडकवल्याचा दावा आरोपीने केला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.