Sarvan Comunidade Land Scam: देवा, घाेटाळेबहाद्दरांना चांगलीच अद्दल घडव! सर्वण ग्रामस्‍थांचे गाऱ्हाणे, कोमुनिदाद जमीन घोटाळ्याचा पर्दाफाश होणार?

Goa Comunidade Land Grab Allegations: सर्वणमधील गावकऱ्यांनी जाहीर केल्याप्रमाणे अखेर रविवारी सायंकाळी गावातील श्री श्यामपुरुष मंदिरासमोरील चव्हाट्यावर देवाला गाऱ्हाणे घातले.
Goa Comunidade Land Grab Allegations
Sarvan Comunidade Land ScamDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: सर्वण कोमुनिदादमधील घोटाळ्याला वाचा फोडण्यासाठी संघटित झालेल्या सर्वणमधील गावकऱ्यांनी जाहीर केल्याप्रमाणे अखेर रविवारी सायंकाळी गावातील श्री श्यामपुरुष मंदिरासमोरील चव्हाट्यावर देवाला गाऱ्हाणे घातले. त्‍यानंतर श्री सातेरी मंदिराजवळ ‘घाडी’मार्फत गाऱ्हाणे घालण्‍यात आले. यावेळी पन्नासहून अधिक गावकरी उपस्थित होते.

‘‘कोमुनिदादची जमीन एका प्रकल्पासाठी परस्पर विकून घोटाळा करणाऱ्यांना योग्य धडा शिकवा’’ असे देवाला साकडे घालण्‍यात आले. सर्वण कोमुनिदादीत कोणताही आर्थिक घोटाळा झालेला नाही, असा जो खुलासा समाज माध्यमावरून कोमुनिदादच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे, तो एक बनाव आहे, असा दावा ग्रामस्थांनी केला आहे. दरम्‍यान, या घोटाळ्याला वाचा फोडण्यासाठी कायदेशीर मार्गही अवलंबविण्यात येईल, असेही ग्रामस्‍थांनी स्पष्ट केले.

Goa Comunidade Land Grab Allegations
Goa Land Grab Scam: सुलेमान खानला अखेर जामीन मंजूर! हस्ताक्षराचा अहवाल ठरला गेमचेंजर; मेरशी सत्र न्यायालयाचा निर्णय

...म्‍हणूनच घातले देवासमोर गाऱ्हाणे

कोमुनिदादची जमीन परस्पर विकून कोटींचा आर्थिक घोटाळा करण्‍यात आला आहे. कोमुनिदादचे सदस्य असलेल्या ग्रामस्‍थांना अंधारात ठेवून कोमुनिदाद मंडळाच्या काही पदाधिकऱ्यांनी कोमुनिदादची जमीन परस्पर बेकायदेशी विकली आहे. सर्वण येथील सर्वे नं. 19/2 या कोमुनिदादशी संबंधित जमिनीचा काही भाग दिल्लीस्थित एका बड्या बिल्डरला विकल्याची माहिती पुढे आली आहे. त्‍यामुळेच कोमुनिदादचे सदस्य असलेले सावंत ग्रामस्‍थ संघटित झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com