Samudra Pratap Vessel: भारताची ‘सागरी ताकद’ आता अधिक बळकट! राजनाथ सिंगांचे प्रतिपादन; गोवा शिपयार्डनिर्मित ‘समुद्र प्रताप’ तटरक्षक दलात

Rajnath Singh Goa: पहिले व भारतीय तटरक्षक दलातील सर्वांत मोठे प्रदूषण नियंत्रक ‘समुद्र प्रताप’ हे जहाज भारतीय तटरक्षक दलाच्या ताफ्यामध्ये सामावून घेण्याच्या सोहळ्यात संरक्षणमंत्री बोलत होते.
Samudra Pratap Vessel , Rajnath Singh, Pramod Sawant
Samudra Pratap Vessel , Rajnath Singh, Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: भारत एक सक्रिय व बलाढ्य सागरी राष्ट्र म्हणून उदयास येत आहे. हिंद महासागर क्षेत्रात स्थिरता, सहकार्य व नियम आधारित व्यवस्था सुनिश्र्चित करण्यात देशाची भूमिका दिवसेंदिवस महत्त्‍वाची बनत चालली आहे, असे प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी येथे केले.

गोवा शिपयार्डने भारतीय तटरक्षक दलासाठी बांधलेले दोन मालिकांतील पहिले व भारतीय तटरक्षक दलातील सर्वांत मोठे प्रदूषण नियंत्रक ‘समुद्र प्रताप’ हे जहाज भारतीय तटरक्षक दलाच्या ताफ्यामध्ये सामावून घेण्याच्या सोहळ्यात संरक्षणमंत्री बोलत होते.

यावेळी सन्माननीय पाहुणे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, दक्षिण गोव्याचे खासदार कॅप्टन विरियातो, वास्कोचे आमदार कृष्णा साळकर, संरक्षण मंत्रालयाचे सचिव राजेश कुमार, भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक परमेश शिवमणी, या जहाजाचे प्रमुख व उपमहानिरीक्षक अशोक कुमार भामा, गोवा शिपयार्डचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ब्रजेश कुमार उपाध्याय, तसेच भारतीय तटरक्षक दल व गोवा शिपयार्डचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

आज देशाकडे कुणीही वाकड्या नजरेने पाहिले, तर त्या नजरेचा चेहरामोहरा बदलण्याची ताकद भारताकडे आहे, असे सांगून संरक्षणमंत्र्यांनी गोवा शिपयार्डच्या योगदानाचे विशेष कौतुक केले. दरम्‍यान, ‘समुद्र प्रताप’ हे जहाज कोची येथील जिल्हा मुख्यालयाच्या अखत्यारीत कार्यरत राहणार आहे.

Samudra Pratap Vessel , Rajnath Singh, Pramod Sawant
Samudra Pratap Vessel: तटरक्षक दलाच्या ‘समुद्र प्रताप’ जहाजाचे होणार अनावरण! मंत्री राजनाथ सिंग, CM सावंत यांची उपस्थिती

आत्मनिर्भर संरक्षण ही धोरणात्मक गरज

संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरता ही केवळ घोषणा नसून ती धोरणात्मक गरज असल्याचे राजनाथ सिंग यांनी स्पष्ट केले. बदलत्या जागतिक परिस्थितीत जहाजांना अत्याधुनिक उपकरणे, कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित देखभाल प्रणाली व सायबर सुरक्षित प्लॅटफॉर्मने सुसज्ज करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. २०४७ पर्यंत ‘विकसित भारत’ साकार करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रगती, संशोधन, स्थानिक उत्पादन आवश्यक असल्यावर त्यांनी भर दिला.

Samudra Pratap Vessel , Rajnath Singh, Pramod Sawant
Amulya Vessel: भारतीय तटरक्षक दलाच्या ‘अमूल्य’चे जलावतरण! किनारपट्टींची सुरक्षा होणार मजबूत, Watch Video

‘समुद्र प्रताप’ची वैशिष्ट्ये व भूमिका

हे जहाज सागरी प्रदूषण नियंत्रण, पर्यावरण संरक्षण, सागरी देखरेख, शोध व बचाव मोहिमा, सागरी हितसंबंधांचे रक्षण यासाठी तैनात राहणार आहे. उपमहानिरीक्षक अशोक कुमार भामा यांच्या नेतृत्वाखाली या जहाजावर १४ अधिकारी व ११५ कर्मचारी कार्यरत असतील. विशेष म्‍हणजे या जहाजावर पहिल्यांदाच दोन महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com