Samudra Pratap Vessel: तटरक्षक दलाच्या ‘समुद्र प्रताप’ जहाजाचे होणार अनावरण! मंत्री राजनाथ सिंग, CM सावंत यांची उपस्थिती

Rajnath Singh In Goa: गोवा शिपयार्डमध्ये आयोजित या कार्यक्रमाला भारतीय तटरक्षक दलाचे व गोवा शिपयार्डचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित असतील. या जहाजाचे ऑगस्ट महिन्यामध्ये जलावतरण करण्यात आले होते.
Samudra Pratap Vessel , Rajnath Singh, Pramod Sawant
Samudra Pratap Vessel , Rajnath Singh, Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: गोवा शिपयार्डने भारतीय तटरक्षक दलासाठी बांधलेले पहिले प्रदूषण नियंत्रण जहाज ‘समुद्र प्रताप’ सोमवारी (ता. ५) संरक्षण मंत्री राजनाथ सिंग व मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत भारतीय तटरक्षक दलाच्या ताफ्यात सामावून घेण्यात येणार आहे.

गोवा शिपयार्डमध्ये आयोजित या कार्यक्रमाला भारतीय तटरक्षक दलाचे व गोवा शिपयार्डचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित असतील. या जहाजाचे ऑगस्ट महिन्यामध्ये जलावतरण करण्यात आले होते. त्यानंतर २४ डिसेंबरला भारतीय तटरक्षक दलाकडे औपचारिकरीत्या सुपूर्द केले होते. हे जहाज ताफ्यातील सर्वात मोठे जहाज आहे.

प्रगत प्रणालींनी सुसज्ज

११४.५ मीटर लांबी आणि १६.५ मीटर रुंदी असलेल्या, तसेच ४,१७० टन विस्थापन क्षमता असलेल्या या जहाजावर १४ अधिकारी आणि ११५ खलाशी असतील.

हे जहाज तेल गळती शोधण्यासाठी, हलक्या ते अत्यंत चिकट तेलांचे प्रदूषक पदार्थ गोळा करण्यासाठी, दूषित पदार्थांचे विश्लेषण करण्यासाठी, दूषित पाण्यातून तेल वेगळे करून ते जहाजावर सुरक्षितपणे साठवण्यासाठी प्रगत प्रणालींनी सुसज्ज आहे, ज्यामुळे विशेष आर्थिक क्षेत्रात आणि सर्वसमावेशक प्रदूषण प्रतिसाद कार्ये करणे शक्य होणार आहे.

जहाजाची खासियत

‘सागर प्रताप’ हे समुद्रातील तेल गळतीचा सामना करण्यासाठी स्वदेशी बनावटीद्वारा विकसित केलेल्या दोन हायब्रीड प्रदूषण नियंत्रण जहाजांच्या मालिकेतील पहिले जहाज आहे.

हे जहाज आजपर्यंतच्या भारतीय तटरक्षक दलाच्या ताफ्यातील सर्वात मोठे जहाज आहे.जे तटरक्षक दलाची ऑपरेशन क्षमता लक्षणीयरीत्या वाढविण्यास साहाय्य करणार आहे.

जहाज हल-फ्लश्ड साइड स्वीपिंग आर्म्सने सुसज्ज आहे, ज्यामुळे प्रवासादरम्यान तेल गळती प्रभावीपणे रोखता येते, तसेच यात मागे घेता येण्याजोगे स्टर्न थ्रस्टर्स आहेत, जे प्रदूषण प्रतिसाद आणि स्थान-नियंत्रण कार्यांदरम्यान उत्कृष्ट कुशलता प्रदान करतात.

हे डायनॅमिक पोझिशनिंग क्षमता असलेले पहिले भारतीय तटरक्षक दलाचे जहाज आहे, जे आव्हानात्मक सागरी परिस्थितीत उच्च अचूकतेची कार्ये सुनिश्चित करते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com